Sundar Pichai Birthday: सुंदर पिचाई यांचा IIT ते Google CEO पर्यंतचा प्रवास

जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलचे पहिले भारतीय सीईओ सुंदर पिचाई आज त्यांचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
Google CEO Sundar Pichai
Google CEO Sundar PichaiDainik Gomantak
Published on
Updated on

जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलचे पहिले भारतीय सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) आज त्यांचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहेत. तामिळनाडूमध्ये जन्मलेले सुंदर पिचाई 2015 मध्ये जगातील आघाडीच्या IT कंपनी Google चे CEO बनले आहेत. ते भारतीय वंशाचे पहिले नागरिक आहेत ज्यांना Google मध्ये सर्वात मोठी जबाबदारी मिळाली आहे. (Sundar Pichai journey from IIT to Google CEO)

Google CEO Sundar Pichai
सोशल मीडिया पोस्टवरून जम्मूच्या बदरवाहात तणाव; संचारबंदी लागू, इंटरनेट बंद

सुंदर पिचाई यांचे पूर्ण नाव पिचाई सुंदरराजन असे आहे. पिचाई यांचा जन्म भारतातील एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. लहानपणी त्यांना आजच्यासारख्या सोई सुविधा मिळाला नाहीत. तर पिचाई यांचा यशाचा प्रवास इतका सोपा नव्हता. त्यांचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. तर आपण जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित अनेक रंजक गोष्टी...

शिष्यवृत्तीवर परदेशात अभ्यास

10 जून 1972 रोजी सुंदर पिचाई यांचा जन्म तामिळनाडूची राजधानी चेन्नई मध्ये झाला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले सुंदर पिचाई यांचे वडील इलेक्ट्रिक इंजिनिअर होते, पण त्यावेळी मुलांना चांगले शिक्षण देण्याइतके ते सक्षम नव्हते. सुंदर पिचाई यांनी 1993 मध्ये आयआयटी खडगपूरमधून बीटेक पुर्ण केले. यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमएस आणि व्हार्टन स्कूलमधून एमबीए पुर्ण केले. व्हार्टन स्कूलमध्ये शिकत असताना पिचाई यांनी दोन शिष्यवृत्ती प्रधान केल्या.

Google CEO Sundar Pichai
PM मोदींचा गुजरात दौरा IN-SPACE मुख्यालयासह अनेक प्रकल्पांचे करणार उद्घाटन

2015 मध्ये Google चे CEO

2004 मध्ये सुंदर पिचाई Google मध्ये रुजू झाले. जिथे त्यांनी गुगल टूलबार आणि क्रोम विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. काही वर्षांत, Google Chrome जगातील सर्वात लोकप्रिय इंटरनेट ब्राउझर बनले आणि 2014 मध्ये, पिचाई यांच्याकडे सर्व Google उत्पादने आणि प्लॅटफॉर्मशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या काळात पिचाई गुगल टूलबार, क्रोम, डेस्कटॉप सर्च, गॅजेट्स, गुगल पॅक, गुगल गिअर्स, फायरफॉक्स एक्स्टेंशन इत्यादी लोकप्रिय उत्पादनांचे प्रभारी होते. 2015 मध्ये पिचाई यांना Google चे CEO बनवण्यात आले.

वडिलांच्या एक वर्षाच्या पगारातून 'हे' तिकीट विकत घेतले होते,

2020 च्या यूट्यूब डिअर क्लास व्हर्च्युअल सेरेमनीमध्ये सुंदर पिचाई म्हणाले की, “मला वयाच्या 10व्या वर्षापर्यंत टेलिफोन नव्हता. मला अमेरिकेत येईपर्यंत संगणकावर नियमित काम करण्याची संधी कधीही मिळाली नाही. तर टीव्हीवर एकच चॅनल त्यावेळी बघायला मिळायचे.

आपल्या जुन्या दिवसांची आठवण करून देताना सुंदर पिचाई म्हणाले होते की, “मला अमेरिकेत येण्यासाठी माझ्या वडिलांचा एक वर्षाचा पगार खर्च करावा लागला होता, त्यानंतर मी स्टॅनफोर्ड विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी पोहोचू शकलो होतो आणि यावेळी मी पहिल्यांदा विमानात बसलो.

Google CEO Sundar Pichai
सिद्धू मुसेवाला हत्याकांड: गँगस्टर गोल्डी ब्रारविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी

अमेरिका त्यावेळी खूपच महाग होती. भारतात घरी कॉल करण्यासाठी, एका मिनिटाला 2 यूएस डॉलर्सपेक्षा जास्त पैसे द्यावे लागायचे. त्या दिवसांमध्ये त्यांच्या वडिलांना कुटुंबासाठी स्कूटर घेण्यासाठी तीन वर्षे पैसे वाचवावे लागले. तर आज, सुंदर पिचाई यांची एकूण संपत्ती सुमारे $1310 दशलक्ष आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com