विद्यार्थ्यांना विद्यापीठातून एकाच वेळी दोन पदवी घेता येणार : UGC अध्यक्षांची घोषणा

विद्यार्थ्यांना विद्यापीठातून एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करता येणार असल्याची घोषणा यूजीसी अध्यक्षांनी केली आहे.
UGC
UGCDainik Gomantak
Published on
Updated on

यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. UGC विद्यार्थ्यांना दोन पूर्ण-वेळ पदवी कार्यक्रम एकाच वेळी फिजिकल मोडमध्ये शिकण्याची परवानगी देणार आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार (M Jagdesh Kumar) यांनी मंगळवारी यासंबंधीची घोषणा केली.

अध्यक्ष म्हणाले, 'विद्यार्थी (Student) आता एकाच विद्यापीठात किंवा वेगवेगळ्या विद्यापीठांमधून दोन पूर्णवेळ पदवी कार्यक्रम करु शकतील. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) लवकरच या संदर्भात तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. "नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा (NEP) मध्ये जाहीर केल्यानुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे," असेही जगदीश कुमार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान म्हटले आहे. यास परवानगी देण्यासाठी UGC नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार आहे. ज्यामध्ये उमेदवाराला दोन पदवी कार्यक्रम एकाच वेळी पूर्ण करता येणार आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये एम जगदेश कुमार यांना विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ते सातत्याने नवनवीन घोषणा करत आहेत.

UGC
आंध्र प्रदेशातील तिरुमला व्यंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, 3 भाविक जखमी

त्याचवेळी, दोनच दिवसांपूर्वी त्यांनी ट्विटरवर यूजीसी नेट परीक्षेची तारीख शेअर केली होती. एम जगदेश कुमार यांनी सोशल मीडियावरील Twitter वरुन ट्विट करत म्हटले की, "डिसेंबर 2021 आणि जून 2022 च्या विलीन झालेल्या चक्रांसाठी, पुढील UGC-NET जून 2022 च्या 1ल्या /2ऱ्या आठवड्यात घेण्यात येईल. NTA द्वारे तारखा निश्चित केल्या जात असल्याने नेमके वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

8th Pay Commission Latest Update
Girl Dancing In Moving Local Train
Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com