

हिंदू धर्मातील प्रत्येक देवतेच्या अवतारामागे काहीतरी अर्थ जोडलेला असतो. त्यापैकी एक अत्यंत रहस्यमय आणि उग्र अवतार म्हणजे भगवान कालभैरव. भगवान शिवाचे हे रूप फक्त उग्र नाही, तर यामागे धर्म, न्याय आणि अहंकाराचा नाश हेही तत्त्व दडलेले आहे.
शिवमहापुराणात ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात झालेल्या संवादात कालभैरवाच्या उत्पत्तीचा उल्लेख आढळतो. ब्रह्मा, विष्णू आणि शिव या त्रिमूर्तींमध्ये ‘सृष्टिकर्ता कोण श्रेष्ठ?’ अशी चर्चा सुरु झाली.
ब्रह्मा म्हणाले, “मीच सर्वोच्च आहे. सृष्टीची निर्मिती माझ्याशिवाय होऊ शकत नाही.” हे ऐकून भगवान शिव शांत राहिले. हे उत्तर ऐकल्यावर भगवान विष्णूंना त्यांच्या शब्दांत दडलेला अहंकार आणि अतिआत्मविश्वास जाणवला. त्यामुळे ते रागावले आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी चारही वेदांकडे गेले.
सर्वप्रथम ते ऋग्वेदाजवळ गेले. ऋग्वेदाने उत्तर दिले – “शिवच सर्वश्रेष्ठ आहेत. ते सर्वशक्तिमान आहेत आणि सर्व जीवजंतू त्यांच्यातच समाविष्ट आहेत.” यानंतर त्यांनी यजुर्वेदाला विचारले. यजुर्वेद म्हणाले – “ज्याची आपण यज्ञाद्वारे पूजा करतो, तोच सर्वश्रेष्ठ आहे आणि तो शिव व्यतिरिक्त दुसरा कोणी असू शकत नाही.”
ब्रम्हदेवांनी वेदांचे उत्तर ऐकून मोठ्याने हसणे सुरू केले. तेव्हाच तेथे भगवान शंकर प्रकट झाले. शिवांना पाहताच ब्रह्माजींचे पाचवे मस्तक क्रोधाच्या ज्वाळांनी पेटले.
त्या क्षणी भगवान शिवांनी आपल्या एका अवताराची निर्मिती केली आणि त्याला ‘काल’ असे नाव दिले — म्हणजेच मृत्यूचा अधिपती. हा काल म्हणजेच शिवांचा अवतार ‘भैरव’ होय. कालभैरवच्या हातात त्रिशूल, गळ्यात मुंडमाळ, आणि चेहऱ्यावर अद्भुत तेज होते.
क्रोधाने पेटलेले मस्तक भैरवाने धडापासून वेगळे केले. त्यानंतर भगवान शिवांनी भैरवाला सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्याचा आदेश दिला.
भगवान शिवांनी हा अवतार केवळ क्रोधामुळे घेतला नव्हता. कालभैरव हे ‘कालाचे अधिपती’ आहेत — म्हणजेच ते वेळ, मृत्यू आणि नियतीवर नियंत्रण ठेवतात. या रूपाद्वारे शिवांनी जगाला दाखवले की, अहंकार कितीही मोठा असला तरी तो सत्य आणि धर्मापुढे टिकत नाही. ब्रह्मदेवाचा अहंकार मोडण्यासाठीच हा अवतार साकार झाला.
कालभैरवाची पूजा विशेषतः ‘अष्टमी’ आणि ‘काळाष्टमी’च्या दिवशी केली जाते. असे मानले जाते की, त्यांच्या कृपेने भय, पाप आणि मृत्यूचा त्रास दूर होतो. कालभैरव हे काशी नगरीचे ‘कोतवाल’ मानले जातात, म्हणजेच त्या पवित्र भूमीचे रक्षक. काशीमध्ये ‘कालभैरव मंदिर’ हे अतिशय प्रसिद्ध असून, तिथे श्रद्धाळू भक्त ‘भैरवाष्टक’ पठण करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.