Priority for Women: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महिलांना विशेष प्राधान्य

मोदी मंत्रिमंडळात आता एकूण 11 महिला (priority for women) मंत्री आहेत.
Modi Cabinet Expansion Special priority for women
Modi Cabinet Expansion Special priority for women
Published on
Updated on

मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारात (Modi Cabinet Expansion) महिलांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा शेवटच्या दिवशी म्हणजेच काल बुधवारी संध्याकाळी विस्तार करण्यात आला. तेव्हा मोदी मंत्रिमंडळात आता एकूण 11 महिला मंत्री आहेत. समारंभात सर्व महिला वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर (Handloom Saree) साड्या परिधान करून दिसल्या. निर्मला सीतारमण,(Nirmala Sitharaman) स्मृती इराणी, दर्शन जरदोष, प्रतिमा भौमिक, शोभा करंडलाजे यांच्यासह सर्व महिलांनी या सोहळ्यात रंगीबेरंगी साड्या परिधान भर घातली आहे. (Special priority for women in the expansion of the Modi government's Union Cabinet)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या ट्विटर हँडलवर महिला मंत्र्यांचे फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये या 11 ही महिला मंत्र्यांनी साध्या पण सुंदर अशा साड्य़ा घालून भारतीय संस्कृतीचे दर्शन झाल्याचेच बघायला मिळाले.

Modi Cabinet Expansion Special priority for women
केंद्रीय मंत्री मंडळ विस्तारात 'या' राज्याला सर्वाधिक प्रतिनिधीत्व

चंदेरी हातमाग साडीमध्ये स्मृती इराणी

स्मृती इराणी आकर्षक चंदेरी हातमाग साडीमध्ये दिसल्या. गेल्या वर्षी, राष्ट्रीय हातमाग दिनी, इराणींनी लोकांना 'व्होकल फॉर लोकल' ची जाहिरात करण्याचे आवाहन केले होते आणि प्रत्येकाला स्थानिक ब्रँडचे कपडे घालण्याचे आवाहन केले होते.

सीतारमण नेहमीच त्यांच्या खास साडी शैलिमुळे चर्चेत राहतात

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण नेहमीच त्यांच्या खास साडी शैलिमुळे चर्चेत असतात. कालच्या सोहळ्यादरम्यानही सीतारमणच्या साध्या सुती साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुंदर हातमाग साड्यांपासून ते स्पोर्ट्स सिल्क साड्यांमध्ये त्या झळकल्या आहेत. सीतारामन हातमाग आणि रेशीम साड्या घालण्यास प्राधान्य देतात. त्या नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांमध्ये दिसतात.

Modi Cabinet Expansion Special priority for women
नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या खात्याचे नाव जाहीर

मंत्री परिषदेच्या विस्तारात सात महिला खासदारांनी बुधवारी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. अनुप्रिया पटेल, शोभा करंडलाजे, दर्शन विक्रम जरदोष, मीनाक्षी लेखी, अन्नपूर्णा देवी, प्रतिमा भौमिक आणि भारती प्रवीण पवार अशा शपथविधी झालेल्या महिला खासदार आहेत. कोरोना प्रोटोकॉल फॉलो करून राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात केंद्रीय मंत्री मंडळाचा हा पहिलाच विस्तार होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com