Covid-19 PIB Fact Check: देशात आणि जगात पुन्हा कोरोना रुग्णांची वाढू लागली आहे. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा आपले पाय पसरले आहेत. याचीच खबरदारी घेत चीनसह सहा देशांतून विमानाने येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने कोविडच्या प्रतिबंधासंदर्भात एक अॅडवायजरी जारी केली आहे. या सगळ्यात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजने धक्काच बसला आहे.
सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलेल्या बातम्यांमध्ये दावा केला जात आहे की, कोविड-19 रोखण्यासाठी देशात 15 दिवसांचा लॉकडाऊन असेल. देशात लॉकडाऊन असेल आणि शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये 15 दिवस बंद राहतील, असेही या बातमीत सांगण्यात येत आहे. मेसेजमध्ये बातम्या म्हणून टीव्ही स्क्रीनही शेअर करण्यात आली आहे. या मेसेजमुळे लोक पुन्हा लॉकडाऊनची (Lockdown) चर्चा करु लागले आहेत.
दुसरीकडे, 'पीआयबी फॅक्ट चेक'च्या तथ्य तपासणीच्या आधारे असे सांगण्यात आले की, असे सर्व दावे खोटे आहेत. तसेच कोविडशी संबंधित कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासा, असेही सांगण्यात आले आहे . PIB ने दिशाभूल करणारे मेसेज फॉरवर्ड करण्यापासून सावध केले आहे. 4 जानेवारीच्या संध्याकाळी पीआयबीने हे ट्विट केले आहे.
PIB फॅक्ट चेकमध्ये, देशहितासाठी आवश्यक असलेले लॉकडाऊन पूर्णपणे बनावट असल्याचे सांगण्यात आले आहे. सरकारने अशी कोणतीही माहिती दिलेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.