काँग्रेस राज्यसभा उमेदवार घोषणा; अनेकांनी केली नाराजी व्यक्त

''सोनिया गांधींनी 18 वर्षांपूर्वी दिलेला शब्द पाळला नाही''
Congress Leader
Congress LeaderDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पक्षाला संपुर्ण सक्रिय करण्यासाठी पुन्हा एकदा विचारमंथन करण्याची गरज असल्याचं पक्षश्रेष्टी सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी ही याबाबत सकारात्मकता दर्शवली होती. यानंतर काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावर बैठकाचे ही आयोजन करत पक्षाला पुर्वस्थितीत सक्रियकराता यावे. पक्षातील नेत्यांची नाराजी दुर व्हावी यासाठी प्रयत्न केल्याचे दिसते आहे. मात्र तरीही काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस थांबलेली नाही. ( Sonia Gandhi did not keep her word 18 years ago)

Congress Leader
गायक सिद्धू मूसवाला हत्येप्रकरणी पंजाबपासून दिल्लीपर्यंत निदर्शने, 'आप'चा तीव्र विरोध

काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या घोषणेनंतर अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर येऊ लागली आहे. राज्यसभेसाठी संधी न मिळाल्याने काँग्रेसमधील काही नेत्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा मोरारजी यांनी सोनिया गांधींनी 18 वर्षांपूर्वी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेसने महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमधील इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. इम्रान प्रतापगडी हे काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातून काँग्रेसला एकही योग्य उमेदवार मिळाला नाही का, असा प्रश्न उपस्थित होत असताना काँग्रेसमधील नाराजी समोर आली आहे. काँग्रेसने राजस्थानमधील तीन जागांसाठीदेखील दुसऱ्या राज्यातील उमेदवारांना संधी दिली आहे. राजस्थानमधून काँग्रेसने रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक, प्रमोद तिवारी यांना संधी दिली आहे. तर, कर्नाटकातून जयराम रमेश, छत्तीसगडमधून राजीव शुक्ला, रणजीत रंजन, हरियाणातून अजय माकेन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर नाराजी व्यक्त करताना अनेकांनी सोशल मिडीयावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री आणि काँग्रेसच्या नेत्या नगमा यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी शब्द पाळला नसल्याचे म्हटले. सोनिया गांधी यांनी 18 वर्षांपूर्वी पक्ष प्रवेश करताना राज्यसभा उमेदवारी देणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी काँग्रेस पक्ष सत्तेवर होता. तेव्हापासून आपण सोनिया गांधी या दिलेला शब्द पूर्ण करतील या अपेक्षेवर असल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com