Bhagat Singh Koshyari : मोठी बातमी! राष्ट्रपतींनी भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा स्वीकारला; हे असणार नवे राज्यपाल

राष्ट्रपतींनी महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी आणि लडाखचे उपराज्यपाल माथूर यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
Governor Bhagat Singh Koshyari
Governor Bhagat Singh KoshyariDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी आपले राजीनामा पत्र पंतप्रधान मोदींकडे सुपुर्द केले होते. उरलेला काळ चिंतनात घालवायचा आहे असे त्यावेळी कोश्यारी म्हणाले होते. त्याचबरोबर आपण यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा केली असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते.

यासंदर्भातील महत्वाची बातमी आता समोर आली आहे. राष्ट्रपतींनी महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी आणि लडाखचे उपराज्यपाल माथूर यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com