"मुलीचा संसार चालावा असे वाटत असेल तर..." सासरवाडीत शौचालय नसल्याने जावई नाराज

Toilet: शौचालय कसे बांधायचे, त्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत आणि सरकारी योजनांचा लाभही मिळत नाही. जावई हे समजायला तयार नाही, असे सरगुन देवी यांनी सांगितले.
Son-in-law did not come to father-in-law's house for 2 years because there was no toilet in father-in-law's house, matter has reached to the divorce.
Son-in-law did not come to father-in-law's house for 2 years because there was no toilet in father-in-law's house, matter has reached to the divorce.Dainik Gomantak
Published on
Updated on

Son-in-law did not come to father-in-law's house for 2 years because there was no toilet in father-in-law's house, matter has reached to the divorce:

'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटाची झलक नालंदा जिल्ह्यातील तेलमार गावात पाहायला मिळाली. सासरच्या घरी शौचालय नसल्यामुळे जावई 2 वर्षांपासून सासरच्या घरी आली नाही.

आता हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे. शौचालय नसल्यामुळे जावयाने पत्नीसमोर घटस्फोटाचा प्रस्तावही ठेवला आहे. यामुळे संतापलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी लग्न ठरवणाऱ्याकडे तक्रार केली आहे.

तक्रारीनंतर या लग्न ठरवणाऱ्याने मुलीच्या कुटुंबीयांनाही मारहाण केली. यामध्ये ऋषी नावाचा व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत मुलीची आई सरगुन देवी यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीचे लग्न पाटणा शहरातील विक्कीसोबत दोन वर्षांपूर्वी झाले होते. लग्नाच्या वेळी मुलाने शौचालय बांधण्याची मागणी केली होती.

Son-in-law did not come to father-in-law's house for 2 years because there was no toilet in father-in-law's house, matter has reached to the divorce.
इस्रोने शेअर केले उपग्रहातून टिपलेले राम मंदिराचे फोटो, पाहा अंतराळातून कशी दिसते आयोध्यानगरी

त्यानंतर मुलीच्या वडिलांनी विकीला शौचालय बांधून घेतो असे आश्वासन दिले होते. मात्र लग्नानंतरही मुलीच्या घरी शौचालय बांधण्यात आले नाही. त्यामुळे लग्नानंतर गेल्या दोन वर्षांत एकदाही जावई सासरच्या घरी आलेला नाही. यावरून पती-पत्नीमधील तेढ वाढत आहे.

Son-in-law did not come to father-in-law's house for 2 years because there was no toilet in father-in-law's house, matter has reached to the divorce.
व्यापाऱ्यांची भरभराट! Ram Madir उद्घाटन संबंधित साहित्याचा एक लाख कोटींहून अधिक व्यवसाय

त्याचवेळी मुलीच्या आईने सांगितले की, शौचालय कसे बांधायचे, त्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत आणि सरकारी योजनांचा लाभही मिळत नाही. जावई हे समजायला तयार नाही, असे सरगुन देवी यांनी सांगितले.

शौचालय बांधल्यानंतरच मुलीचा संसार चालेल, अन्यथा घटस्फोटाला तयार राहा, असे तो म्हणत आहे. याबाबत मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नाचे आयोजन करणाऱ्या पाहुण्याकडे तक्रार केली असता त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांना मारहाण केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com