Honey Singh Divorce: अखेर अडीच वर्षांच्या कोर्ट कचेऱ्यांनंतर हनी सिंगचा घटस्फोट मंजूर, पत्नीला द्यावे लागणार करोडो रुपये

Honey Singh Divorce: या त्याच्या मताला शालिनीदेखील दुजोरा दिल्यानंतर दोघांच्या संमतीनंतर कोर्टाने निर्णय दिला.
Honey Singh Divorce
Honey Singh Divorce Dainik Gomantak
Published on
Updated on

Honey Singh Divorce: प्रसिद्ध रॅपर हनी सिंगचा घटस्फोट मंजूर झाला आहे. ७ नोव्हेंबर रोजी दिल्ली न्यायालयाने सिंगर आणि त्यांची पत्नी शालिनी तलवार यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. आता या दोघांचे मार्ग कायमचे वेगळे झाले आहेत.

शालिनीने हनी सिंगवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. पण आता घटस्फोटानंतर अभिनेत्याला मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. माजी पत्नीला पोटगी म्हणून करोडो रुपये द्यावे लागतील.

हनी सिंग आणि शालिनी तलवार यांचा विवाह 23 जानेवारी 2011 रोजी झाला होता. आणि आता 12 वर्षांनंतर ते वेगळे झाले आहेत. अडीच वर्षांपूर्वीच कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल करण्यात आली होती.

आता कोर्टाने मंजुरी देण्यापूर्वी कोर्टाने पुन्हा एकदा हनी सिंगलात्याला शालिनीसोबत राहण्याची इच्छा आहे का असे विचारले होते. त्यावर हनी सिंगने आता आम्ही एकत्र राहू शकत नाही. या त्याच्या मताला शालिनीदेखील दुजोरा दिल्यानंतर दोघांच्या संमतीनंतर कोर्टाने निर्णय दिला.

हनी सिंग किती देणार पोटगी

मिळालेल्या माहीतीनुसार, हनी सिंग आणि शालिनी सिंग यांनी घटस्फोटादरम्यान एकमेकांवर केलेले सर्व आरोप- प्रत्याआरोप मागे घेतले आहेत. शालिनीने हनी सिंगकडून पोटगीसाठी 10 कोटी रुपये मागितले होते. ही रक्कम आता 1 कोटीवर आली आहे.

या रकमेबाबत दोघांमध्ये करार झाला आहे. अशा परिस्थितीत गायक आता ही रक्कम आपल्या माजी पत्नीला देणार आहे.

हनी सिंगची मैत्रीण

यो यो हनी सिंग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हिरदेश सिंगने डिसेंबर 2022 मध्ये एका कार्यक्रमात त्याची गर्लफ्रेंड टीना थडानीसोबत त्याचे नाते अधिकृत केले. एका मुलाखतीदरम्यान, रॅपरने मित्रांद्वारे टीना थडानीला कसे भेटले हे उघड केले.

टीना थडानी हनी सिंगच्या नवीन गाण्यात 'परीस का ट्रिप'मध्ये दिसली होती. टीना थडानी ही कॅनेडियन अभिनेत्री आणि मॉडेल असून ती आता मुंबईत राहते. तो एक चित्रपट निर्माता देखील आहे, ज्याने 'द लेफ्टओव्हर्स' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com