सोशल मीडिया कंपनी सर्व राजकीय पक्षांना समान स्थान देत नाही: सोनिया गांधी

सोनिया गांधी यांनी जगातील मोठ्या सोशल मीडिया कंपन्या सर्व राजकीय पक्षांना समान स्थान देत नसल्याचा आरोपही केला आहे.
Sonia Gandhi
Sonia GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी लोकसभेत पुन्हा एकदा सरकारवरती जोरदार हल्ला चढवला. यासोबतच सोनियांनी फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आरोप केला आहे की, ते राजकीय पक्षांना नैरेटिव करण्याचे काम करत आहेत. ते म्हणाले की, जागतिक सोशल मीडिया (Social Media) कंपन्या सर्व पक्षांना समान संधी देत ​​नसल्याचे वारंवार निदर्शनास आले. त्यानंतर भाजपनेही सोनिया गांधीना प्रत्युत्तर दिले. (Social media company does not give equal space to all political parties)

Sonia Gandhi
निवडणुकीच्या पराभवानंतर नेत्यांच्या गटबाजीमुळे काँग्रेस फुटीच्या दिशेने

सोनिया गांधीं यांचा ट्विटर-फेसबुकवर आरोप

सोनिया गांधी यांनी जगातील मोठ्या सोशल मीडिया कंपन्या सर्व राजकीय पक्षांना समान स्थान देत नसल्याचा आरोपही केला आहे. गेल्या वर्षी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा संदर्भ देत काँग्रेस अध्यक्ष म्हणाल्या की, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसाठी फेसबुकचे तथ्य तपासण्याचे नियम फिरवले जात आहेत. सत्ताधारी पक्षाच्या संगनमताने ज्या प्रकारे सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे, तो लोकशाहीसाठी घातक असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी फेसबुकवरती केला आहे. सोनिया गांधी यांनी फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप रोखण्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलण्यास सांगितले आहेत.

भाजपने दिले प्रत्युत्तर,

मात्र, सोनिया गांधींच्या हल्ल्याला भाजपने तत्काळ प्रत्युत्तर दिले आहे. सोनिया गांधी बोलल्यानंतर पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी झिरो आवरमध्ये काँग्रेसवरती जोरदार प्रहार केला. दुबे म्हणाले की, काँग्रेसने संविधानात दिलेल्या भाषण स्वातंत्र्याच्या अधिकाराचे कधीही पालन केले नाहीये. काँग्रेसच्या राजवटीत भाषणस्वातंत्र्याच्या हक्काचे उल्लंघन झाल्याची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करावी, अशी मागणी दुबेंनी सरकारकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com