
अफगाणिस्तानची राजधानी काबूल ते दिल्लीचा प्रवास सामान्यतः काही तासांचा असतो, पण रविवारी एका १३ वर्षाच्या मुलाने हा १००१ किलोमीटरचा प्रवास आपला जीव धोक्यात घालून पूर्ण केला. केएएम एअरलाइन्सच्या आरक्यू-४४०१ विमानाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (आयजीआय) लँडिंग केली, तेव्हा विमानाजवळ भटकत असलेले मूल दिसल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले.
तपासात हे उघड झाले की मुलगा विमानाच्या लँडिंग गियर बॉक्समध्ये लपला होता. विमानतळ सुरक्षा आणि गुप्तचर संस्था या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. सीआयएसएफ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुलाने कबूल केले की त्याने काबूल विमानतळावरील सुरक्षा घेरा कसा तरी तोडला आणि उड्डाणापूर्वी लँडिंग गियर बॉक्समध्ये लपला.
लँडिंग गियर बॉक्समध्ये उड्डाण दरम्यान तापमान अत्यंत कमी आणि ऑक्सिजनची पातळी फारच कमी असते. येते माणूस जिवंत राहू शकत नाही. मात्र, मुलाने दिल्लीपर्यंतच्या दोन तासांच्या प्रवासात आपला जीव वाचवला. सुरक्षा यंत्रणांसाठी ही घटना गंभीर चिंतेची आहे कारण इतकी मोठी सुरक्षा चूक कशी घडली याचे स्पष्टीकरण अद्याप मिळालेले नाही.
विमान दिल्लीत उतरल्यानंतर एअरलाइन कर्मचाऱ्यांनी ताबडतोब सीआयएसएफ आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांना या बाबीची माहिती दिली. मुलाला ताब्यात घेतल्यावर चौकशीत त्याने सांगितले की त्याने उत्सुकतेमुळे हे पाऊल उचलले. 'कसं वाटतं ते पहायचं होतं', असं तो मुलगा म्हणाला.
एअरलाइन अधिकाऱ्यांनी विमानाची तपासणी केली असता लँडिंग गियरच्या डब्यात एक लाल लहान स्पीकरही सापडला, जो मुलाचा असल्याचे समजते. विमान पुढील उड्डाणांसाठी सुरक्षित घोषित करण्यात आले.
मुलाला परत पाठवण्याचे नियम
भारतीय सुरक्षा संस्थांनी मुलाला ताबडतोब परत पाठवण्याचा निर्णय घेतला. दुपारी ४ वाजता त्याच एअरलाइनच्या दुसऱ्या विमानाने मुलाला काबूलला परत पाठवण्यात आले. भारतीय इमिग्रेशन आणि एव्हिएशन सुरक्षा नियमांनुसार, वैध कागदपत्रांशिवाय किंवा बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणाऱ्याला ताबडतोब हद्दपार केले जाते.
मूल अल्पवयीन असूनही आणि वैध कागदपत्र नसल्यामुळे त्याला निर्वासित दर्जा न देता त्याच विमानाने अफगाणिस्तानला परत पाठवण्यात आले. ही कारवाई परदेशी कायदा, १९४६ आणि संबंधित इमिग्रेशन नियमांनुसार करण्यात आली, ज्यात असे नमूद आहे की जो कोणी बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करतो त्याला देशात राहण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.