आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात प्रत्येकजण व्होकल बनला आहे. दररोज सोशल मीडियावर व्हिडिओ, फोटो व्हायरल होत असतात. यातच, मोदी सरकारमधील माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु आणि माजी केंद्रीय वस्त्रोद्याोगमंत्री स्मृती इराणी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरेश प्रभु यांच्या पोस्टची सर्वाधिक चर्चा होत आहे. इराणी यांनी प्रभु यांच्याबरोबर सेल्फी घेतला. त्यांच्या या सेल्फीवर प्रभु यांनी पोस्ट केली. ''धन्यवाद स्मृती इराणी शेवटी, तुम्ही मला शिकवलेच...'' अशा अशायाची पोस्ट प्रभु यांनी करताच सोशल मीडियावर चर्चांना उधान आलं. प्रभु यांच्या या पोस्टवर सोशल मीडिया यूजर्स देखील आपआपल्या प्रतिक्रिया देतायेत. प्रभु यांच्या पोस्टवर स्मृती इराणी यांनी देखील पोस्ट केली. स्मृती आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, ''सर तुम्हाला पुन्हा भेटण्याचा आनंद काही वेगळाच आहे. ‘Hey Prabhu selfie ...'
दरम्यान, सोशल मीडियावर प्रभु आणि इराणी यांच्या या सेल्फीवर संमिश्र प्रतिक्रिया यूजर्स देतायेत. एक सोशल मीडिया यूजर्स म्हणाला की, 'आदरणीय सुरेश प्रभूजी, मी तुमचा आधीही आणि आताही आदर करतो. मात्र तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका.' तर दुसरा यूजर्स म्हणाला की, ''सर, तुम्ही रेल्वे मंत्री असताना twitter वर ऍक्टिव्ह केले होते, मात्र तुम्ही सेल्फीसाठी कोणाचे तरी आभार मानत आहात. मेहनती लोकांसाठी तुम्हीच खरे प्रेरणास्थान आहात.''
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी ओळख असणाऱ्या सुरेश प्रभूंनी मोदी सरकारमध्ये रेल्वेमंत्री म्हणून काम केले. त्यांच्या कार्यकार्याळात रेव्ले मंत्रालयाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. रेल्वेमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यामध्ये प्रभु यांचे योगदान कोणीही विसरु शकत नाही.
मोदी सरकारमधील फायरब्रॅंड नेत्या म्हणून ओळख असणाऱ्या स्मृती इराणी यांनी मनुष्यबळ विकाममंत्री, केंद्री वस्त्रोद्योगमंत्री म्हणून पदभार संभाळला. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांना अमेठीमधून राहुल गांधींच्या विरोधात पराभवाचा सामना करावा लागला. राहुल गांधी यांच्याविरोधात त्यांनी निकराचा लढा दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.