Rahul Gandhi: राहुल गांधींना झटका, केरळ राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची काही दिवसांपूर्वी खासदारकी रद्द करण्यात आली.
Rahul Gandhi
Rahul GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची काही दिवसांपूर्वी खासदारकी रद्द करण्यात आली. त्यानंतर त्यांना आणखी झटका बसला असून, केरळ सरकारने त्यांना दिलेले दोन वैयक्तिक कर्मचारी माघारी घेतले आहेत. राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून खासदार होते, त्यांना राज्य सरकारने दोन वैयक्तिक कर्मचारी दिले होते.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सामान्य प्रशासनाच्या संयुक्त सचिवांनी जारी केलेल्या आदेशात वैयक्तिक सहाय्यक रतीश कुमार केआर आणि ड्रायव्हर मोहम्मद रफी यांना त्यांच्या कर्तव्यातून मुक्त करण्यात आले आहे. रतीश कुमार आणि मुहम्मद रफी यांना त्यांची ओळखपत्रे सरेंडर करण्यास सांगण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रतीश कुमार यांना त्यांच्या विभागात पुन्हा रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. ते यापूर्वी सुलतान बथेरी येथील सर्वेक्षण अधीक्षक कार्यालयात कार्यरत होते. गुजरातच्या न्यायालयाने मोदी आडनाव प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींना अपात्र ठरवले होते.

Rahul Gandhi
Rahul Gandhi Disqualified: राहुल गांधी यांची खासदारकी का रद्द झाली ?

राहुल गांधी यांची खासदारकी का रद्द झाली ?

राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आले आहे. लोकसभा सचिवालयाने 24 मार्च रोजी यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे.

राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व 23 मार्चपासून संविधानाच्या कलम 102 (1) (ई) च्या कलम 8 आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 (लोकप्रतिनिधी कायदा 1951) च्या कलम 8 नुसार रद्द करण्यात आले आहे. असे या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे. राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर गुजरातमधील एका न्यायालयाने त्यांना संसदेचे सदस्यत्व अपात्र ठरवण्याचे कारण पुढे केले आहे.

मोदी आडनावाचे सर्वजण चोर कसे असतात? असे वक्तव्य राहुल गांधीनी प्रचारादरम्यान कर्नाटकमध्ये केलं होतं. त्यानंतर मानहानीच्या खटल्यात सूरतच्या जिल्हा न्यायालयाने सुनावणी राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आले. त्यात त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com