कोणत्या समलिंगी पुरुषाला मासिक पाळी येते? स्मृती इराणी पुन्हा एकदा पगारी रजेवर स्पष्टच बोलल्या

Smriti Irani Menstrual Cycle Controversy: केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी पुन्हा एकदा मासिक पाळी आणि पगारी रजेवर स्पष्टच बोलल्या.
Smriti Irani
Smriti IraniDainik Gomantak

Smriti Irani Menstrual Cycle Controversy: केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी पुन्हा एकदा मासिक पाळी आणि पगारी रजेवर स्पष्टच बोलल्या. काही मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी राज्यसभेत खासदार मनोझ झा यांच्यावरही जोरदार प्रहार केला. स्मृती इराणी यांनी मनोज झा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना एक प्रश्न विचारला ज्यात ते म्हणाले होते की मासिक पाळीच्या दिवसात एलजीबीटीक्यू लोकांना सुट्टी देण्याचे मोदी सरकारचे धोरण आहे का? उत्तर देताना स्मृती इराणी यांनी प्रश्न विचारला की कोणत्या समलिंगी पुरुषाला मासिक पाळी येते? जी त्याला पगारी रजा मिळावी. या प्रश्नाचे उत्तर मनोज झा यांनी द्यावे.

इराणी म्हणाल्या की, ''पगारी रजा मिळणे म्हणजे तुमच्या बॉस आणि एचआरला मासिक पाळी येण्याबद्दल सांगणे, पण महिलांनी त्या दिवसांची प्रसिद्धी का करावी? मासिक पाळीबद्दल त्यांनी त्यांच्या बॉस आणि एचआरला का सांगावे? बॉस आणि एचआर यांना त्यांच्या महिला कर्मचाऱ्याच्या मासिक पाळीची माहिती का असावी? यामुळे महिलांना भेदभावाला सामोरं जावं लागणार नाही का? महिलांच्या कामात अडथळा येणार नाही का? त्यांना समाजात समान दर्जा देऊनही त्या निराश होणार नाहीत का? पेड लीव्ह पॉलिसी केली तर महिलांवर अन्याय होईल. त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.''

Smriti Irani
Smriti Irani on Rahul Gandhi: 'भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी...,' राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यावर स्मृती इराणींचा हल्लाबोल

विकलांगताचा अर्थ दिव्यंगता नसून त्याचा अर्थ अडथळा आहे

स्मृती इराणी यांनी आपल्या वक्तव्यात विकलांगता हा शब्द वापरल्याच्या वादावर आपली भूमिका स्पष्ट करताना, मासिक पाळीच्या संदर्भात 'विकलांगता' हा शब्द का वापरला? यावर इराणी म्हणाल्या की, इथे विकलांगता म्हणजे दिव्यांगता नसून कामात अडथळे निर्माण करणे, असा आहे. दिव्यंगताचा पर्यायी शब्द आहे. पेड लीव्ह पॉलिसी तयार करण्यास विरोध करताना, त्यांनी संसदेत मासिक पाळी आणि पगारी रजा या विषयावर स्वतःच्या अनुभवांच्या आधारे भाषण केले, जेणेकरुन कामाच्या ठिकाणी कोणत्याही महिलेशी भेदभाव केला जाऊ नये.

Smriti Irani
Smriti Irani: '...असे राजकीय पक्ष दहशतवाद्यांच्या पाठीशी', केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी का दिली अशी प्रतिक्रिया

महिलांना समान संधी का नाकारतात?

राज्यसभेत खासदार मनोज झा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्मृती इराणी म्हणाल्या की, मासिक पाळी हा महिलांच्या जीवन प्रवासाचा नैसर्गिक भाग आहे आणि त्यात अडथळा नाही. पगारी रजा सारखे मुद्दे मांडू नये, कारण यामुळे महिलांना समान संधीपासून वंचित राहतील. मी या विषयावर बरेच बोलू शकते, पण खासदार मनोज झा यांनी विचारलेल्या प्रश्नांचा उद्देश महिलांच्या समस्यांवर उपाय शोधणे हा नसून त्यांना हतोत्साहित करणे हा होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com