प्यार में धोका! 6 नायजेरियन तरुणांच्या प्रेमात पडल्या 700 भारतीय महिला आणि पुढे घडले असे...

नोएडा पोलिसांनी परदेशी नागरिकांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
Nigeria
Nigeria Dainik Gomantak
Published on
Updated on

Nigeria: नोएडा पोलिसांनी परदेशी नागरिकांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीत सामील असलेल्या 7 परदेशी व्यक्तींसह 8 जण चॅटिंग अॅपच्या माध्यमातून भारतीय महिलांची फसवणूक करत होते. या टोळीने दोन-चार नव्हे तर तब्बल 700 महिलांना प्रेमाच्या नावाखाली गंडा घातला आहे.

चॅटिंग अॅपच्या माध्यमातून गिफ्टसाठी कस्टम चार्जच्या नावाखाली त्यांची फसवणूक करण्यात आली.

(Six Nigerians arrested in Noida)

पोलिसांनी याप्रकरणी 6 नायजेरियन तरुण आणि एक नायजेरियन आणि एका भारतीय महिलेला अटक केलीय. पोलिसांनी त्यांच्याकडून 3 लॅपटॉप, 31 मोबाईल फोन आणि 31 हजारांची रोकड जप्त केली आहे.

याशिवाय त्याच्याकडून 5 पासपोर्ट, 1 आधार कार्ड, 1 पॅन कार्ड, 1 मतदार ओळखपत्र, 1 बँक पासबुक जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेटिंग अॅपच्या माध्यमातून हे लोक भारतीय महिलांशी मैत्री करायचे, नंतर नौदल अधिकारी असल्याचे सांगत विश्वास जिंकत असे. यासाठी हे लोक गुगलवरील नेव्ही ऑफिसरचा फोटो काढून प्रोफाईलवर टाकायचे.

Nigeria
Verna : असली म्हणून बनावट सोने विक्री, अनेकांना घातल्या टोप्या; महाराष्ट्रातील दोघांना अटक

महिलांना भेटवस्तू किंवा परदेशी रोख रक्कम पाठवण्याबाबत सांगत, आरोपी पार्सलचे फोटो पाठवून त्यांचा विश्वास जिंकायचे. काही दिवसांनी आरोपी महिलांना फोन करून महागड्या भेटवस्तू आणि विदेशी युरो पाठवले आहेत, मात्र त्यांची कस्टम ड्युटी जमा करावी लागेल, असे सांगयचे.

आरोपींची एक संघटित टोळी आहे, ते मुळात आफ्रिकेतील नायजेरिया/ घाना/ अबिदजान देशाचे रहिवासी आहेत. 2021 मध्ये ते अभ्यास आणि उपचारासाठी व्हिसावर भारतात आला होते. त्याच्या व्हिसाचा कालावधी 2021 च्या 06 महिन्यांनंतरच संपला होता. त्यानंतरही हे लोक आपल्या देशात न जाता भारतात राहून गुन्हे करू लागले.

आरोपी भारतीय मुलींशी इन्स्टाग्राम आदी अॅप्सच्या माध्यमातून बनावट नावाने बोलायचे. त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांक घेतल्यानंतर त्यांच्याशी बोलायचे. त्यानंतर मुली व महिलांकडून त्यांचा पत्ता घेऊन त्यांच्या पत्त्यावर सोन्याचे दागिने/किंमतीची घड्याळ/फोन इत्यादी बनावट स्वरूपात पाठविण्याचे भासवून, विविध प्रकारचे कस्टम ड्युटी/कर लावून महिलांची फसवणूक करत होते.

यानंतर, त्याचा दुसरा साथीदार, महिला कस्टम अधिकारी असल्याचे दाखवून, महिला मैत्रिणींना कॉल करेल आणि त्यांना सांगेल की तुमच्या मित्राने पाठवलेल्या पार्सलमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी चलन आणि दागिने आहेत, ज्यासाठी कस्टम कर भरावा लागेल. तुम्ही कस्टम टॅक्स भरल्यास तुम्हाला तुमचे पार्सल मिळेल. असे सांगून त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि फसवणूक करायचे अशी माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com