Girl In Golden Temple Video: 'हा भारत नाही, पंजाब आहे...', सुवर्ण मंदिरात जाण्यापासून तरुणीला रोखलं!

Girl In Golden Temple: एका तरुणीला सुवर्ण मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Girl In Golden Temple Video
Girl In Golden Temple VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Girl In Golden Temple: सोशल मीडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणीला सुवर्ण मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

तरुणीच्या चेहऱ्यावर तिरंगा काढलेला असल्याने तिला आत जाण्यापासून रोखण्यात आले. यातच आता, या संपूर्ण प्रकरणावर शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे वक्तव्य समोर आले आहे.

वास्तविक, नुकताच हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ अलीकडचा आहे, जेव्हा एक मुलगी तिथे गेली होती.

मुलगी हरियाणवी लहजामध्ये बोलताना ऐकू येत आहे. तर तिचा मित्र तिच्याशी संवाद साधताना दिसत आहे. यादरम्यान या तरुणीसमोर एक पगडीधारी व्यक्ती तिच्याशी वाद घालताना दिसतो. आणि तिला आत जाण्यापासून रोखतानाही दिसतो.

Girl In Golden Temple Video
Punjab: माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी होणार भाजपवासी, जाणून घ्या काय चाललंय?

मुलीचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला

या प्रकरणाचा व्हिडिओ बनवल्याने तो व्यक्ती चिडला आणि त्याने तरुणीचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ इथे संपतो.

त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. लोकांनी तात्काळ कारवाईची मागणी केली. मीडिया रिपोर्टनुसार, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे सरचिटणीस गुरचरण सिंग ग्रेवाल यांनी या गैरवर्तनाबद्दल माफी मागितली आहे.

एसजीपीसीने या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे

निवेदनात म्हटले आहे की, सुवर्ण मंदिर हे गुरु रामदासजींचे दरबार आहे. कोणत्याही जाती, धर्म, देशाच्या व्यक्तीला यामध्ये येण्यापासून रोखले जात नाही आणि थांबवता येणार नाही. तरुणीसोबत जे झाले त्याबद्दल क्षमस्व.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com