Punjab: माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी होणार भाजपवासी, जाणून घ्या काय चाललंय?

Charanjit Singh Channi: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी यापूर्वीच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Charanjit Singh Channi
Charanjit Singh ChanniDainik Gomantak
Published on
Updated on

Charanjit Singh Channi: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी यापूर्वीच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचवेळी पंजाबचे आणखी एक माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी भारतीय जनता पक्षात प्रवेश करु शकतात. त्यांनी पंजाब भाजपच्या काही नेत्यांचीही भेट घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरीकडे, या भेटीनंतर चरणजीत सिंह चन्नी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करु शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. तथापि, अद्याप या संदर्भात कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही आणि काँग्रेस नेते प्रताप सिंह बाजवा यांनी या अफवा फेटाळून लावल्या आहेत. ही बातमी खोटी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Charanjit Singh Channi
Rahul Gandhi Disqualified: राहुल गांधी निलंबन प्रकरणावर अमेरिकेचं महत्त्वाचं विधान, नेमकं काय म्हटलं?

चन्नी पंजाबच्या राजकारणातून गायब झाले

2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर चरणजीत सिंह चन्नी पंजाबच्या राजकारणातून गायब आहेत.

पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्या पुतण्याला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केल्यामुळेही त्यांना विरोधाचा सामना करावा लागला.

त्याचवेळी, पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर चन्नी त्याच्या गावी गेला होते. यातच आता, नवज्योतसिंग सिद्धूच्या सुटकेनंतर चन्नी भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चन्नी यांनी खर्गे यांचीही भेट घेतली

राहुल गांधींसोबत चरणजीत सिंह चन्नी भारत जोडो यात्रेतही दिसले होते. या काळात त्यांनी प्रियांका गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचीही भेट घेतली होती. काँग्रेस आणि जालंधर लोकसभा जागेवर पोटनिवडणूक होत आहे. अशा स्थितीत माजी मुख्यमंत्री चन्नी यांना प्रचारासाठी सोबत आणण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

Charanjit Singh Channi
Punjab Government: पंजाबमध्ये आप सरकारला एक वर्ष पूर्ण, CM भगवंत मान यांनी केली 'ही' मोठी घोषणा

दरम्यान, तुरुंगातून सुटलेले नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा पंजाबच्या राजकारणात सक्रिय झाले असून त्यांच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी गुरुवारी दिल्लीत काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com