Shubman Gill: गिलने रचला इतिहास! सलग चौथ्यांदा जिंकला ICC 'प्लेअर ऑफ द मंथ' अवॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

Shubman Gill Player Of The Month: जुलै 2025 महिन्यासाठी आयसीसी (ICC) 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार जाहीर झाला. इंग्लंड दौऱ्यावरील त्याच्या शानदार कामगिरीमुळे त्याला हा सन्मान मिळाला.
Shubman Gill Breaks Virat Kohli
Shubman GillDainik Gomantak
Published on
Updated on

Shubman Gill Player Of The Month: भारतीय संघाचा युवा सलामीवीर आणि कर्णधार शुभमन गिल याला जुलै 2025 महिन्यासाठी आयसीसी (ICC) 'प्लेअर ऑफ द मंथ' (Player Of The Month) पुरस्कार जाहीर झाला. इंग्लंड दौऱ्यावरील त्याच्या शानदार कामगिरीमुळे त्याला हा सन्मान मिळाला. विशेष म्हणजे, गिलच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच भारतीय संघ इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवू शकला.

जुलै महिन्यातील दमदार कामगिरी

दरम्यान, जुलै महिन्यासाठी 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी इंग्लंडचा (England) कर्णधार बेन स्टोक्स आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू वियान मुल्डर यांच्याकडून शुभमन गिलला कडवी टक्कर मिळाली. 25 वर्षीय गिलने जुलै महिन्यात तीन कसोटी सामन्यांत 94.50 च्या प्रभावी सरासरीने एकूण 567 धावा काढल्या. यामध्ये एका द्विशतकाचाही समावेश होता. गिलने त्याच्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले.

Shubman Gill Breaks Virat Kohli
Shubman Gill: मालिकावीर शुभमन गिलला पदकासोबत मिळाली 'दारूची बाटली', कारण काय? किती आहे किंमत? जाणून घ्या

गिलची प्रतिक्रिया

'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार जिंकल्यानंतर शुभमन गिलने आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, "जुलै महिन्यासाठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड झाल्याने मला खूप चांगले वाटत आहे. माझ्यासाठी हा पुरस्कार खूप खास आहे, कारण कर्णधार म्हणून माझ्या पहिल्या कसोटी मालिकेतील कामगिरीसाठी मला हा सन्मान मिळाला आहे. बर्मिंगहॅममध्ये केलेले द्विशतक माझ्यासाठी सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक राहील." या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल त्याने ज्युरीचे आभारही मानले.

चौथ्यांदा जिंकला पुरस्कार

शुभमन गिलने आतापर्यंत एकूण चार वेळा आयसीसी 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार जिंकला आहे. याआधी त्याने फेब्रुवारी 2025, जानेवारी 2023 आणि सप्टेंबर 2023 मध्ये हा पुरस्कार पटकावला होता. जागतिक क्रिकेटमध्ये हा पुरस्कार चार वेळा जिंकणारा तो एकमेव खेळाडू ठरला. इंग्लंड दौऱ्यात गिलने अशी कामगिरी केली, ज्याचे उदाहरण क्वचितच पाहायला मिळते. त्याने संपूर्ण मालिकेतील पाच सामन्यांमध्ये एकूण 754 धावा केल्या, ज्यात चार शतकांचा समावेश होता.

Shubman Gill Breaks Virat Kohli
Shubman Gill: टी-शर्ट आणि ऑटोग्राफ असणारी कॅप! गावस्करांनी 'ओव्हल'मध्ये शुभमन गिलला दिले खास गिफ्ट VIDEO

कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकणारा पहिला खेळाडू

गिलने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावले होते, मात्र भारताला त्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 269, तर दुसऱ्या डावात 161 धावांची धमाकेदार खेळी खेळली. त्याच्या या कामगिरीमुळेच भारतीय संघ (Team India) 336 धावांनी विजय मिळवण्यात यशस्वी झाला. विशेष म्हणजे, इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकणारा शुभमन गिल हा पहिला भारतीय कर्णधार ठरला, ज्यामुळे त्याचा हा विक्रम नेहमीच लक्षात राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com