Shubman Gill: मालिकावीर शुभमन गिलला पदकासोबत मिळाली 'दारूची बाटली', कारण काय? किती आहे किंमत? जाणून घ्या

Shubman Gill wine bottles player of the series: भारतीय कसोटी संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऐतिहासिक कामगिरी करत विजय मिळवला आहे. या विजयात कर्णधार शुबमन गिलने मोठी भूमिका बजावली.
Shubman Gill
Shubman GillDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय कसोटी संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऐतिहासिक कामगिरी करत विजय मिळवला आहे. या विजयात कर्णधार शुबमन गिलने मोठी भूमिका बजावली. इंग्लंडच्या भूमीवर कसोटी मालिकेत विजय मिळवणं हे भारतासाठी नेहमीच आव्हानात्मक ठरलं आहे, मात्र गिलच्या नेतृत्वाखालील या दौऱ्यात भारताने अपूर्व कामगिरी करत इतिहास रचला.

या मालिकेत शुबमन गिलने एकूण ७५४ धावा करत अप्रतिम फलंदाजी सादर केली. कर्णधार म्हणून त्याचा हा पहिलाच परदेश दौरा होता, पण गिलने आपली क्षमता सिद्ध केली. त्याच्या या जबरदस्त कामगिरीसाठी त्याला मालिकावीर (Player of the Series) पुरस्काराने गौरविण्यात आले.

Shubman Gill
Goa Crime: रस्त्यावर अडवून बेदम मारहाण, 12 लाखांचे दागिने - मोबाईल पळवला; जखमी 'अंकल'च्या पार्श्वभूमीमुळे वाढली गुंतागुंत

याशिवाय, गिलला इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम याने वैयक्तिकरित्या गौरविले. गिलला विशेष पदक देण्यात आलं असून त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पदकावर एका बाजूला ‘Rothesay Test Series’ असं लिहिलं आहे, तर दुसऱ्या बाजूला ‘England vs India – Player of the Series’ असा उल्लेख आहे. गिलने या पदकासोबत काढलेला सेल्फी फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

याचबरोबर, गिलला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देखील मिळाला होता. एजबेस्टन कसोटीत त्याने खेळलेली २६९ आणि १६१ धावांची शानदार खेळी भारतीय विजयात निर्णायक ठरली.

त्याच्या या डावानंतर त्याला इंग्लंडच्या परंपरेनुसार एक दारूची बाटली भेट म्हणून देण्यात आली होती. एवढंच नाही, तर प्लेअर ऑफ द सीरिज ठरल्यानंतरही त्याला आणखी एक दारूची बाटली देण्यात आली. इंग्लंडमध्ये प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द सीरिज पुरस्कारासोबत दारूची बाटली देण्याची परंपरा आहे. शुभमन गिलला मिळालेल्या वाईनची किंमत १४,०५८ रुपये आहे.

Shubman Gill
Goa Politics: खरी कुजबुज; तिसरा ‘लाॅटरी जिल्‍हा’ केला तर...?

दरम्यान, या मालिकेत मोहम्मद सिराजलाही शेवटच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळाला. मात्र, त्याने फक्त पदक स्वीकारले आणि दारूची बाटली घेण्यास नकार दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com