Shubhman Gill: "त्यांनी भारताला स्वबळावर अनेक सामने जिंकून दिले, आम्हाला त्यांची गरज..." नवा कर्णधार शुभमन गिलचे रोहित-विराटबाबत मोठं वक्तव्य

Shubman Gill Reaction On Rohit-Virat: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून दिग्गज खेळाडू आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही संघात पुनरागमन करणार आहेत.
virat, rohit and shubhman
virat, rohit and shubhmanDainik Gomantak
Published on
Updated on

Shubman Gill Reaction On Rohit-Virat: सध्या शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मायदेशात वेस्ट इंडीजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता भारत मालिका विजयासाठी मैदानात उतरेल. तत्पूर्वी, या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (Australia Tour) जाणार आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातूनच दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही संघात पुनरागमन करणार आहेत.

दरम्यान, या दौऱ्यात रोहित आणि विराट गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसतील, त्यामुळे या दौऱ्यापूर्वी कर्णधार शुभमन गिलने या दोन वरिष्ठ खेळाडूंबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

virat, rohit and shubhman
IND vs NED: भारतीय फलंदाजांची आतिषबाजी! 48 वर्षांच्या वर्ल्डकपमध्ये कोणालाच न जमलेला केला पराक्रम

रोहित-विराटबाबात काय म्हणाला गिल?

वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शुभमन गिलला नेतृत्वाच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने रोहित शर्माच्या नेतृत्वाचे कौतुक केले. गिल म्हणाला की, "रोहित भाईने संघात जी मैत्री आणि जे धैर्य (Patience) कायम ठेवले आहे, तेच मी पुढे कायम ठेवू इच्छितो. त्यांच्याप्रमाणेच मी संघातील आणि ड्रेसिंग रुममधील वातावरण शांत ठेवू इच्छितो."

पुढे विराट कोहली आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचे महत्त्व सांगताना गिल म्हणाला, "रोहित आणि विराटने टीम इंडियासाठी अनेक सामने जिंकले. इतका अनुभव आणि कौशल्य खूप कमी लोकांमध्ये असते. आम्हाला त्यांची गरज आहे. हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाचा कणा आहेत आणि त्यांनी अनेक वेळा आपल्या वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर भारताला सामने जिंकून दिले आहेत." गिलच्या या वक्तव्यावरुन कर्णधार म्हणून तो वरिष्ठ खेळाडूंना किती महत्त्व देतो, हे स्पष्ट होते.

virat, rohit and shubhman
IND vs SL, 3rd ODI: शुभमन गिलचा शतकी धमाका! मास्टर-ब्लास्टरच्या 'या' विक्रमाची बरोबरी

वनडे मालिका

वेस्ट इंडीज कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया (Team India) 15 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका (ODI Series) खेळवली जाईल. या मालिकेतील पहिला सामना 19 ऑक्टोबरला पर्थ (Perth) येथे होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 23 ऑक्टोबरला तर तिसरा आणि शेवटचा सामना 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या महत्त्वपूर्ण मालिकेसाठी रोहित आणि विराट संघात परतल्याने टीम इंडियाची ताकद निश्चितच वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com