Shubman Gill Century: शुभमन गिलचे वादळ! शतकी खेळीने हिटमॅनचा 'तो' विक्रम उध्दवस्त, 'या' बाबतीत बनला नंबर 1 फलंदाज

Shubman Gill: भारतीय क्रिकेट संघाचा युवा कर्णधार शुभमन गिल सध्या अप्रतिम फॉर्ममध्ये आहे.
Shubman Gill Century
Shubman Gill CenturyDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट संघाचा युवा कर्णधार शुभमन गिल सध्या अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने आपले आणखी एक शतक झळकावत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या शतकासह शुभमनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला असून तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक शतके करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

अहमदाबाद कसोटीत ५० धावांवर बाद झालेल्या गिलने दिल्लीतील दुसऱ्या कसोटीत मात्र संयमी आणि प्रभावी फलंदाजी साकारली. त्याने १७७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले, ज्यामध्ये १३ चौकार आणि एक षटकार होता. गिलने सुरुवातीला वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा सन्मान राखत खेळ केला, पण एकदा तो स्थिरावल्यानंतर त्याची फलंदाजी अधिक आक्रमक झाली. सध्या तो १९५ चेंडूत १२८ धावांवर नाबाद आहे आणि त्यात त्याने १६ चौकार व दोन षटकार ठोकले आहेत.

Shubman Gill Century
Ronaldo In Goa: रोनाल्डो गोव्यात येणार? CM सावंतांनी केले आशावादी वक्तव्य; राज्याला ‘सुपरस्टार’च्या आगमनाचे वेध

शुभमन गिलने आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपले दहावे शतक झळकावले आहे. त्याने रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे. सर्वाधिक शतकांचा विक्रम भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर होता, ज्याने या स्पर्धेत नऊ शतके झळकावली होती. आता शुभमनने त्याला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.

दरम्यान, या यादीत यशस्वी जयस्वाल सात शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर ऋषभ पंत आणि केएल राहुल प्रत्येकी सहा शतकांसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात भारतासाठी सर्वाधिक शतके

शुभमन गिल – १०*

रोहित शर्मा – ९

यशस्वी जयस्वाल – ७

ऋषभ पंत – ६

केएल राहुल – ६

Shubman Gill Century
Goa Crime: वादावादीतून चेहऱ्यावर, नाकावर बुक्क्यांनी मारहाण; अपुरे पुरावे आणि साक्षीदार अनुपस्थित; आरोपीची झाली निर्दोष सुटका

या कामगिरीमुळे शुभमन गिलने केवळ संघाला मजबूत स्थितीत आणले नाही, तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपले स्थान आणखी भक्कम केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या मालिकेत वर्चस्व राखताना दिसत आहे आणि आगामी सामन्यांमध्येही त्याच्याकडून अशाच भव्य खेळींची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com