
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची (ODI Series) सुरुवात पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर झाली. मात्र, टीम इंडियाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा फलंदाजी विभाग पूर्णपणे ढासळला. पहिल्या १० षटकांतच भारताने तीन प्रमुख फलंदाज गमावले.
रोहित शर्मा फक्त ८ धावा करून बाद झाला, तर विराट कोहलीला शून्यावर माघारी पाठवण्यात आले. शुभमन गिलदेखील आपल्या नव्या भूमिकेत प्रभाव पाडू शकला नाही; तो नाथन एलिसच्या गोलंदाजीवर १० धावांवर बाद झाला.
शुभमन गिलच्या फलंदाजीने निराशा केली असली, तरी कर्णधार म्हणून मैदानात उतरताच त्याने इतिहास रचला. गिल आता भारताचा सर्वात तरुण तिहेरी फॉरमॅट कर्णधार (Test, ODI, T20) ठरला आहे. गिलने २६ वर्षे आणि ४१ दिवसांच्या वयात तिन्ही स्वरूपात भारताचे नेतृत्व केले.
अशा प्रकारे त्याने महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला, ज्याने २६ वर्षे आणि २७९ दिवसांच्या वयात तिहेरी फॉरमॅटमध्ये कर्णधारपद भूषवले होते. या यादीत वीरेंद्र सेहवाग (२८ वर्षे, ४३ दिवस) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.