IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Shubman Gill and KL Rahul Partnership Record: तिसऱ्या विकेटसाठी शुभमन गिल आणि केएल राहुल यांच्यात 188 धावांची विक्रमी भागीदारी झाली.
Shubman Gill and KL Rahul Partnership Record
Shubman Gill and KL Rahul Dainik Gomantak
Published on
Updated on

Shubman Gill and KL Rahul Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवसाचा खेळ मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर (Old Trafford) सुरु आहे. भारतीय संघ सध्या आपल्या दुसऱ्या डावात (Second Innings) फलंदाजी करत आहे. या डावात भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. खाते न उघडता भारताने आपल्या दोन विकेट्स गमावल्या. मात्र, त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी शुभमन गिल आणि केएल राहुल यांच्यात 188 धावांची विक्रमी भागीदारी (Record Partnership) झाली. या भागीदारीदरम्यान या दोघांनी 417 चेंडू खेळत इंग्लंडच्या भूमीवर एक नवा इतिहास रचला.

गिल-राहुल जोडीने रचला इतिहास

इंग्लंडमध्ये एका भागीदारीदरम्यान सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम यापूर्वी राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांच्या नावावर होता. 2002 मध्ये लीड्स कसोटीत (Leeds Test) या दोघांनी 170 धावांची भागीदारी करताना 405 चेंडूंचा सामना केला होता. आता हा 23 वर्षांपूर्वीचा विक्रम शुभमन गिल आणि केएल राहुल यांच्या नावावर जमा झाला. गिल आणि राहुल यांनी 417 चेंडू खेळून हा ऐतिहासिक विक्रम मोडीत काढला. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची जोडी आहे, ज्यांनी 357 चेंडूंचा सामना केला होता.

Shubman Gill and KL Rahul Partnership Record
IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

केएल राहुलचे शतक हुकले

चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात केएल राहुलकडे (KL Rahul) शानदार शतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती, परंतु तो शतकापासून केवळ 10 धावा दूर राहिला. 230 चेंडूंमध्ये 90 धावा काढून तो बाद झाला. या खेळीत त्याने 8 चौकार लगावले आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) त्याला एलबीडब्ल्यू (LBW) बाद केले.

Shubman Gill and KL Rahul Partnership Record
IND vs ENG 4th Test: टीम इंडियाला धक्का! ऋषभ पंतला दुखापत, अ‍ॅम्ब्युलन्समधून नेलं...कसोटी मालिकेतून पडणार बाहेर?

शुभमन गिलचे शानदार शतक

दुसरीकडे, युवा फलंदाज शुभमन गिलने या डावात दमदार शतक झळकावले. त्याने 228 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. 85 षटकांच्या समाप्तीपर्यंत भारतीय संघाने 3 बाद 213 धावा केल्या. हा सामना वाचवण्यासाठी भारतीय फलंदाजांना पाचव्या दिवशी चांगली फलंदाजी करणे आवश्यक आहे. गिल आणि राहुलच्या या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे भारतीय संघाला मोठ्या संकटातून बाहेर काढण्यास मदत झाली. आता उरलेल्या फलंदाजांना हा सामना अनिर्णित राखण्यासाठी किंवा विजयाकडे नेण्यासाठी मोठी कामगिरी करावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com