धक्कादायक! बर्थडे पार्टीत अल्पवयीन मुलीवर नेत्याच्या मुलाकडून सामूहिक बलात्कार

पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे.
West Bengal
West BengalDainik Gomantak
Published on
Updated on

पश्चिम बंगालमधील (West Bengal) नादिया जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. आपल्या मुलीवर वाढदिवसाच्या पार्टीत सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला. तर पार्टीतून (Sexual assault) घरी परतल्यावर तिचा मृत्यू झाला. मुख्य आरोपी हा तृणमूल काँग्रेसच्या (tmc leader) एका पंचायत सदस्याचा मुलगा आहे तर, मुलीच्या घरच्यांनी असाही दावा केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. (Shocking A minor girl was gang raped by a leader's son at a birthday party)

West Bengal
दोन गटांत वाद! रामनवमीला रॅलीदरम्यान 4 राज्यांमध्ये संघर्ष, गुजरातमध्ये 1 ठार

या प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रजगोपाल उर्फ ​​सोहेल गयाली याला आधी ताब्यात घेण्यात आले आणि नंतर रविवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. तर अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याच्यावर POCSO व्यतिरिक्त बलात्कार, खून आणि पुरावे दडपण्याचे देखील आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणात कायदेशीर हस्तक्षेप करण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात (Calcutta High Court) दोन जनहित याचिका परिवाराकडून दाखल करण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाच्या खंडपीठात मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे.

स्थानिक टीएमसी नेत्याच्या घरी झालेल्या पार्टीतून परत आल्यानंतर आमच्या मुलीचे रक्त खूप वाहत होते तसेच तिच्या पोटातही दुकायला सुरुवात झाली होते. याआधी की आम्ही तिला रुग्णालयात घेऊन जाऊ, तिचा जागीच मृत्यू झाला. पार्टीत उपस्थित लोकांशी बोलल्यानंतर खात्री झाली की आरोपी आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

West Bengal
'कच्चा बदाम' नंतर 'लिंबु सोडा'! व्हायरल व्हिडिओ पाहिलात का?

बळजबरीने लेकीचे केले अंत्यसंस्कार

अल्पवयीन मुलीचे मृत्यू प्रमाणपत्र जारी होण्यापूर्वीच तिच्या मृतदेहावर बळजबरीने अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोपही कुटुंबीयांनी आरोपीवर केला आहे. काही लोकांनी सुरुवातीला मुलीला कोणत्याही सरकारी दवाखान्यात किंवा खासगी आरोग्य सुविधेत न नेण्याचा इशारा दिला होता आणि तिला कुठल्यातरी डॉक्टरकडे नेण्यास सांगितले होते, असा आरोपही पीडितेच्या कुटुंबीयांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com