'केजरीवाल म्हणजे सोनेरी स्वप्न दाखवून गोवा लुटायला आलेले मृगजळ'

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी आलेले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.
Shivraj Singh Chouhan criticize arvind kejriwal during goa election campaign
Shivraj Singh Chouhan criticize arvind kejriwal during goa election campaign Dainik Gomantak
Published on
Updated on

विधानसभा निवडणूक 2022 साठी गोव्यात राजकारणाचे सुत्र जोरात हलताना दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हेही गोवा निवडणूकीच्या तयारीसाठी विशेष मेहनत घेत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत त्यांना 'मृगजळ' म्हटले आहे. (Shivraj Singh Chouhan criticize arvind kejriwal during goa election campaign)

केजरीवाल बिना बुडाचा लोटा

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) एका निवडणूक सभेला संबोधित करताना शिवराज म्हणाले, 'आम आदमी पक्षाचे (AAP) केजरीवाल रोज गोवेकरांना नवी स्वप्ने दाखवत आहेत. हे सोनेरी स्वप्न दाखवणारे मृगजळ आहेत. जे दुरून खूप भव्य दिसतात पण जवळ गेल्यास सगळ्यांना फसवून गोव्याची मालमत्ता हिसकावून घेतात. त्याचप्रकारचे केजरीवाल आहे जे गोव्यासाठी कधीही काम करणार नाही.' शिवराज सिंह चौहान यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी शिवराज यांनी केजरीवाल यांना बिना बुडाचा लोटा म्हटले होते.

Shivraj Singh Chouhan criticize arvind kejriwal during goa election campaign
गोवा विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

केजरीवाल गोव्याच्या रणसंग्रामात

अरविंद केजरीवाल गोव्याच्या निवडणूक रणांगणात उतरले आहेत. केजरीवाल हे सातत्याने विरोधी पक्षांवर वर्चस्व गाजवत आहेत आणि त्यांना लक्ष्य करत आहेत. गोव्यात एका कार्यक्रमाला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, "ही विधानसभा निवडणूक गोव्यासाठी महत्त्वाची आहे. गोव्यासाठी काय चांगले आहे हे गोवावासीयांनी ठरवायचे आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार स्थापन करणाऱ्या आम आदमी पक्षाला पाठिंबा देणे हा एक पर्याय आहे. दुसरा पर्याय म्हणजे भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणे." गेल्या निवडणुकीत गोव्यातील जनतेने भाजप सरकारला कंटाळून काँग्रेसची निवड केल्याचा दावा केजरीवाल यांनी केला होता.

Shivraj Singh Chouhan criticize arvind kejriwal during goa election campaign
गोवा निवडणुकीत मतदान करण्यावरुन ज्येष्ठ नागरिकांच्या मनात संभ्रम

दरम्यान 'आप'चे मूळ उद्दिष्टच भ्रष्टाचाराचा समूळ नाश करणे आहे म्हणून काल आपच्या सर्व उमेदवारांकडून पत्रकार परिषदेद्वारे भ्रष्टाचार न करण्याची आणि कधीही लाच न घेण्याची शपथ घेतली आहे. आणि गोव्याच्या जनतेसाठी सर्व आप कार्यकर्त्यांनी स्टँम्प पेपरवर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही असे लिहून दिले. गोव्याच्या 18 लाख लोकांमधून आपने आपले उमेदवार निवडले आहेत. एकाच टप्प्यात गोव्यातील 40 विधानसभा जागांसाठी निवडणूक 14 फेब्रुवारीला मतदान होणार असून 10 मार्चला निकाल लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com