लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार; Mumbai Indiansच्या माजी अष्टपैलू खेळाडूवर गंभीर आरोप, अटक होणार?

Mumbai Indians Former Crickter Allegations: आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या माजी युवा क्रिकेटपटू शिवालिक शर्माबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Cricket
CricketDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई इंडियन्सचा माजी युवा क्रिकेटपटू शिवालिक शर्माबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये त्याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, राजस्थान पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

राजस्थानच्या जोधपूर येथील एका तरूणीनं आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, शिवालिक शर्माने तिच्यावर अत्याचार केले. पीडितेच्या आरोपानुसार, हा घटनाक्रम जोधपूरमध्ये एका अलिशान हॉटेलमध्ये घडला. तिने पोलिसांकडे तक्रार केली असून, तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.

शिवालिक शर्माच्या विरोधात जोधपूरच्या कुडी भगतासनी हौसिंग बोर्ड पोलीस स्टेशनमध्ये अत्याचाराचा गुन्हा नोंदवला गेला आहे. पीडिता तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली आहे की, शिवालिक शर्माने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले.

Cricket
Goa: 'गोव्‍याचे महाराष्‍ट्र गुजरातशी अतूट नाते, आम्‍ही एक आहोत'; महाराष्ट्र-गुजरात दिनानिमित्त्य दामू नाईकांचे प्रतिपादन

पोलीस तक्रारीत म्हटलं आहे की, 'शिवालिक शर्माने लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. शिवालिक शर्माने साखरपुडा होण्याआधी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com