Goa: 'गोव्‍याचे महाराष्‍ट्र गुजरातशी अतूट नाते, आम्‍ही एक आहोत'; महाराष्ट्र-गुजरात दिनानिमित्त्य दामू नाईकांचे प्रतिपादन

Damu Naik: नाईक म्हणाले, गुजरात आणि महाराष्ट्राचे गोव्याशी पूर्वीपासून अतूट नाते आहे. आम्ही सीमांमध्‍ये विभागलो असलो तरी संस्कृती परंपरेच्‍या बाबतीत एक आहोत.
Congress sins being exposed to public says BJP
Goa BJP State President Damu NaikDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारतीय समाज जात, भाषा, प्रदेशाच्या माध्यमातून विखुरलेला आहे. परंतु आम्ही मराठी, गुजराती किंवा गोमंतकीय आहोतच, परंतु सर्वप्रथम भारतीय आहोत, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले.

येथील इन्‍स्‍टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्‍थेत भाजपतर्फे आयोजित महाराष्ट्र आणि गुजरात राज्य स्थापनादिन कार्यक्रमात नाईक बोलत होते. यावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, राकेश अग्रवाल व मान्यवर उपस्थित होते.

Goa BJP: आमदार, मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यास सुरुवात; दामू नाईक यांची दिल्लीतून परत आल्यावर पहिली प्रतिक्रिया
Damu Naik Along With President of BJP J.P.Nadda and goa chief Minister Dr. Pramod SawantDainik Gomantak

नाईक म्हणाले, गुजरात आणि महाराष्ट्राचे गोव्याशी पूर्वीपासून अतूट नाते आहे. आम्ही सीमांमध्‍ये विभागलो असलो तरी संस्कृती परंपरेच्‍या बाबतीत एक आहोत. आमचे पूर्वापार ऋणानुबंध कायम आहेत. भारतीय नागरिकांनी एकत्र यावे याच उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना मांडली आणि त्याच अनुषंगाने आम्ही प्रत्येक राज्याचा दिवस साजरा करत आहोत.

Congress sins being exposed to public says BJP
Goa Politics: "हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वांनाच एकसमान मानतो, समतोल विकास हाच आमचा ध्यास"; कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

गोव्‍याच्‍या विकासात महत्त्वपूर्ण योगदान

अनेकजण आमच्यावर टीका करतात की भाजपकडून प्रत्येक राज्याचा दिवस येथे साजरा केला जातो. परंतु आमचा गोवा राज्यदिन देखील देशभरात साजरा केला जातो. शेवटी आम्ही सगळे भारतीय म्हणून एक आहोत. गुजरात, महाराष्ट्र राज्यातील जे गोव्यात स्थायिक झाले आहेत, त्यांचे गोव्याच्या विकासात तसेच अर्थकारणात महत्त्वाचे योगदान असल्याचे सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.

Congress sins being exposed to public says BJP
Damu Naik: भाजप - मगो युती वाद; दिपक ढवळीकरांच्या भेटीनंतर दामू नाईकांचे महत्वाचे विधान

शिवगर्जना, गरबा, दांडियाने जिंकली मने

या कार्यक्रमादरम्यान गुजरात तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीची झलक दाखविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात कोणते सण-उत्सव साजरे केले जातात याबाबत माहिती देण्‍यात आली. लोकनृत्य, शिवगर्जना आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. सोबतच गुजराती समुदायाने गरबा, दांडिया नृत्‍याचे उत्तम सादरीकरण करत सर्वांची मने जिंकली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com