Patiala violence: पटियाला हिंसाचारप्रकरणी शिवसेना नेत्याला अटक

पटियाला हिंसाचारप्रकरणी शिवसेना नेत्याला अटक करण्यात आली.
Patiala
Patiala Dainik Gomantak

पटियाला हिंसाचार प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी शिवसेना नेत्याला अटक केली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याशिवाय पटियाला शहरातही संचारबंदी लागू करण्यात आली. पटियालामध्ये (Patiala) शिवसेनेने (Shiv Sena) काढलेल्या खलिस्तान मुर्दाबाद मोर्चादरम्यान परिस्थिती खूपच तणावपूर्ण बनली होती. याविरोधात अनेक शीख संघटना आणि हिंदू कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची उकल करण्यासाठी पोलिसांना (Police) खूप संघर्ष करावा लागला. दोन्ही बाजूंकडून मोठ्याप्रमाणात दगडफेकही झाली. (Shiv Sena leader arrested in Patiala violence case)

Patiala
Punjab: पटियालामध्ये शिवसैनिक अन् शीख संघटनांमध्ये हाणामारी

याबाबत मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) म्हणाले की, ''पटियाला येथील संघर्षाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी डीजीपींशी संवाद साधला आहे. सध्या परिसरात शांतता प्रस्थापित झाली आहे. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. कोणालाही राज्यात अशांतता निर्माण करु देणार नाही. पंजाबची शांतता आणि सद्भावना सर्वात महत्त्वाची आहे.''

दरम्यान, शिवसेनेचे पंजाब कार्याध्यक्ष हरीश सिंगला यांच्या देखरेखीखाली आर्य समाज चौकातून खलिस्तान मुर्दाबाद मोर्चाला सुरुवात झाली. खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत शिवसैनिक बाहेर पडले. हरीश सिंगला म्हणाले की, ''शिवसेना पंजाबला कधीही खलिस्तानी होऊ देणार नाही. त्याचबरोबर खलिस्तानचे नावही घेऊ देणार नाही.'' दुसरीकडे, काही शीख संघटनाही तलवारी घेऊन रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंनी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर मोठ्याप्रमाणात दगडफेक झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com