Punjab: पटियालामध्ये शिवसैनिक अन् शीख संघटनांमध्ये हाणामारी

पटियालामध्ये (Patiala) शुक्रवारी मिरवणूक काढताना गदारोळ झाला.
Patiala
PatialaDainik Gomantak
Published on
Updated on

पटियालामध्ये शुक्रवारी मिरवणूक काढताना गदारोळ झाला. शिवसैनिक आणि खलिस्तान समर्थक शीख संघटना समोरासमोर आल्या. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक झाली. दोन्ही बाजूंना रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्याचवेळी तलवारीमुळे एक पोलीस (Police) कर्मचारी जखमी झाला.

Patiala
"एक दिवसाचाही कोळसा नाही...": ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन

दरम्यान, पटियालामधील (Patiala) आर्य समाज चौकात शुक्रवारी शिवसेनेने (Shiv Sena) ठरवून दिलेल्या वेळेनुसार खलिस्तानचा पुतळा जाळण्याची तयारी सुरु केली होती. दरम्यान, त्याचवेळी वातावरण तणावपूर्ण बनले. हा प्रकार लक्षात येताच खलिस्तानी समर्थक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. यानंतर दोन्ही बाजूकडून दगडफेक झाली. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी दोन्ही पक्षांची समजूत घातली. परंतु असे असतानाही खलिस्तानी समर्थक तलवारी घेऊन श्री काली माता मंदिरात पोहोचले.

याशिवाय, हिंदू नेते आणि खलिस्तानी समर्थकांमध्ये जोरदार दगडफेक झाली. त्याचबरोबर एका हिंदू नेत्यावरही धारदार शस्त्राने वार करण्यात आले. याचवेळी एसएचओ करणवीर सिंग यांच्याही हातावर तलवारीचे वार झाले. एसएसपी डॉ.नानक सिंग यांनीही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक राऊंड फायर केले. दुसरीकडे, काही वेब चॅनेलवर एसएचओ यांचा हात कापल्याच्या बातम्या चालू आहेत. जे की, डीसी साक्षी साहनी यांनी निराधार असल्याचे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com