"पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतयं": अपघातानंतर शैलेंद्रनं सांगितली आपबिती

झारखंडमधील (Jharkhand) देवघरमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर केबल कारमधून बचावलेले शैलेंद्र कुमार यादवने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
Shailendra Kumar Yadav
Shailendra Kumar Yadav
Published on
Updated on

"मला कधी-कधी वाटायचं की, मी यापुढे जगणार नाही, पण आता हा माझ्यासाठी पुनर्जन्म असल्यासारखं वाटतयं", असं झारखंडमधील (Jharkhand) देवघरमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर केबल कारमधून बचावलेले शैलेंद्र कुमार यादवने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. बाबा बैद्यनाथ मंदिराजवळील त्रिकुटमधील रोपवेवर आदळल्यानंतर बिहारच्या (Bihar) मधुबनी जिल्ह्यातील पर्यटक, सुमारे 20 तास केबल कारमध्ये अडकले होते. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. (Shailendra Kumar Yadav, who was rescued from a cable car after a tragic accident in Jharkhand told the whole story)

दरम्यान, या दुर्घटनेनंतर आलेला अनुभव सांगताना यादव म्हणाला, 'मला खुर्चीला बांधून हेलिकॉप्टरमधून वाचवण्यात आले. रात्रभर जागाच राहिलो, पाणीही मिळाले नाही.’ दुसरीकडे, घटनास्थळी हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर बचाव कार्यात मदत करत आहेत.

Shailendra Kumar Yadav
'कॅम्पसमधील हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही'; JNU विद्यापीठाने नोटीस केली जारी

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केबल कारची धडक होण्याचे कारण तांत्रिक बिघाड असू शकतो, मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, अपघातानंतर रोपवे व्यवस्थापक आणि इतर कर्मचारी घटनास्थळावरुन पळून गेले. देवघरचे उपायुक्त मंजुनाथ बजंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या टीमवर कारवाई करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थही बचावकार्यात मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे ट्विट उपायुक्तांनी केले असून, त्यांनी लोकांना अफवांकडे कानाडोळा न करण्याचे आवाहन केले आहे.

याशिवाय, राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विटर केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं की, ‘प्रशासन, लष्कर आणि एनडीआरएफ केबल कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत.’ ते पुढे म्हणाले, 'मी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. लवकरच सर्वांना सुखरुप बाहेर काढले जाईल.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com