Odisha: लव्ह, पैसा आणि धोका! ओडिसातील तरूणीची चित्रपटाला लाजवेल अशी कहाणी

ओडिसामधील फिल्ममेकर श्रीधर मार्था यांनी अर्चनाच्या आयुष्यावर चित्रपट तयार करणार असल्याचे म्हटले आहे.
Archana Nag
Archana NagDainik Gomantak
Published on
Updated on

Archana Nag: ओडिसा (Odisha) राज्यात लेडी ब्लॅकमेलरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या तरूणीची कहाणी एखाद्या सिनेमाच्या कथेला लाजवेल अशी आहे. अनेक नेत्यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून फसवणूक, पैसा, अमली पदार्थ आणि धोकाधडी असे काहीसे या तरूणीच्या कहाणीचे कथानक आहे. लव्ह, पैसा आणि धोका! असे स्वरूप असलेल्या या सिनेमाच्या नायिकेचे अर्चना नाग असे (26) नाव आहे.

(Sex, Money, Betrayal: Odisha Blackmailer's 'Rags-To-Riches' Story)

अर्चनाचा हनीट्रॅप; 25 हून अधिक नेते, प्रसिद्ध लोक गळाला

अर्चना नागच्या हनीट्रॅपमध्ये (Honeytrap) 25 हून अधिक नेते आणि प्रसिद्ध लोक अडकल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 18 आमदारांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. त्यापैकी निम्म्याहून अधिक आमदार बीजेडी (BJD) या पक्षाचे आहेत, तर तीन मंत्री आहेत. अर्चना नागचा पती जगबंधु चंद आणि बीजेडी नेते व इतर प्रसिद्ध लोक यांचे फोटो सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

अर्चनाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. पोलिस प्रकणाच्या मुळाशी जात असताना हळूहळू अर्चनाचे काळे उद्योग बाहेर पडू लागले. अर्चना नागला ओडिसा पोलिसांनी अटक केले आहे. पण, अद्याप पोलिसांनी अर्चानाचा जबाब नोंदवला नाही किंवा कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही.

Archana Nag
Congress President Election : 'काँग्रेसला सुरक्षित हातांची गरज आहे'; मनीष तिवारी

तीस कोटींची संपत्ती

अर्चना नागने (2018-2022) चार वर्षात तब्बल तीस कोटी रूपयांची संपत्ती गोळा केली आहे. सुरूवातील एका खासगी सुरक्षा एजन्सीत कामाला सुरूवात केलेल्या अर्चनाने चार वर्षात एवढी संपत्ती कशी कमवली याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे.

अर्चनाच्या आयुष्यावर फिल्म येणार

ओडिसामधील फिल्ममेकर श्रीधर मार्था यांनी अर्चनाच्या आयुष्यावर चित्रपट तयार करणार असल्याचे म्हटले आहे. सध्या या घटनेची ओडिसा राज्यासह संपूर्ण देशात चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात अर्चना नागच्या आयुष्यावर कुठला चित्रपट आल्यास आश्चर्य वाटायला नको.

Archana Nag
Lawrence Bishnoi Viral Video: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला पंजाब पोलिस का देतायेत शब्बासकी?

सरकारही धोक्यात?

अर्चनाच्या या प्रकरणाचे भाजप सध्या अधिक भांडवल करताना दिसत आहे. भुवनेश्वर भाजपचे अध्यक्ष बाबू सिंह सध्या या प्रकरणावरून आक्रामक झाले असून, त्यांनी अनेक आरोप केले आहेत. अर्चानाच्या या प्रकरणात सहभागी नेते आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ओडिसातील बिजू पटनाईक यांच्या सरकारमधील अनेक नेते आणि मंत्री या प्रकरणात सहभागी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पटनाईक सरकारवर देखील याचा परिणाम होता का हे पाहावं लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com