Chhattisgarh Naxali Encounter : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत आता 3 ते 4 नक्षलवादी ठार झाले आहेत. सुकमाच्या गोगुंडा भागात ही चकमक सुरु आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरु आहे. सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात 3-4 नक्षलवादी ठार झाले आहेत तर काही जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. सर्च ऑपरेशन अजूनही सुरु आहे.
दरम्यान, हे संयुक्त ऑपरेशन आहे जे सुकमा डीआरजी, दंतेवाडा डीआरजी, सीआरपीएफ 2री बटालियन आणि सीआरपीएफ 111 बटालियन यांनी संयुक्तपणे राबवत आहेत. इथे सुरक्षा दल नियमित गस्त घालत होते. यावेळी त्यांना नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली, त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु झाला. सुकमाचे एसपी किरण चव्हाण आणि सीआरपीएफचे डीआयजी एरविंद राय यांनी सांगितले की, ते चकमकीवर लक्ष ठेवून आहेत. त्याचवेळी सुरक्षा दल नक्षलवाद्यांना ढेर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्याचवेळी, सुकमा येथील चकमकीची ही बातमी अशा वेळी आली आहे, जेव्हा छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, उपमुख्यमंत्री विजय शर्मा आणि अरुण साओ यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. नुकतेच सीएम विष्णुदेव साई यांनी नक्षलवाद्यांना सडेतोड उत्तर देत छत्तीसगडमध्ये आता डबल इंजिनचे सरकार असल्याचे सांगितले होते. अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन नक्षलवाद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.