15 August Conspiracy: 15 ऑगस्टपूर्वी आयएसआयचा कट उघड, हिजबुल कमांडरच्या मृत्यूनंतर मोठा खुलासा

15 August Conspiracy: काश्मीरमधील दहशतवादी कारवायांवर अंकुश ठेवल्याने दहशतवाद्यांना आश्रय देणारा पाकिस्तान चांगलाच चिडला आहे.
Terrorist Attack On Jammu Kashmir
Terrorist Attack On Jammu KashmirDainik Gomantak
Published on
Updated on

15 August Conspiracy: काश्मीरमधील दहशतवादी कारवायांवर अंकुश ठेवल्याने दहशतवाद्यांना आश्रय देणारा पाकिस्तान चांगलाच चिडला आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा नवा डाव रचला आहे.

वास्तविक, पाकिस्तानचे लष्कर आणि त्यांची गुप्तचर संस्था आयएसआयने या कटाची ब्लू प्रिंट तयार केली आहे. हिजबुलच्या डिव्हिजनल कमांडरच्या एन्काउंटरनंतर हा खुलासा झाला आहे.

आयएसआयचा कट उघड

आयएसआयच्या (ISI) कटाखाली काश्मीरमधून पीओकेमध्ये पळून गेलेल्या दहशतवाद्यांना पुन्हा खोऱ्यात दहशत पसरवण्यासाठी पाठवले जात आहे. कारण काश्मीरी तरुणांना आता आयएसआय आणि दहशतवादी आपल्या जाळ्यात अडकवण्यात अपयशी ठरत आहे. काश्मीरमध्ये दहशतीचे दुकान बंद झाले आहे.

Terrorist Attack On Jammu Kashmir
Jammu And Kashmir: बारामुल्लामध्ये मोठा कट फसला, लष्कर-ए-तैय्यबाचे 3 दहशतवादी गजाआड

हिजबुल कमांडर मुनीर मारला गेला

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधून काही वर्षांपूर्वी पीओकेमध्ये गेलेल्या आपल्या जुन्या निष्ठावंत दहशतवाद्यांचा आधार घेण्याचा आयएसआय प्रयत्न करत आहे.

पीओकेमधील दहशतवाद्यांना पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये पाठवून दहशत पसरवण्याचा पाकिस्तानचा डाव आहे.

वास्तविक, सोमवारी जेव्हा लष्कराने पीओकेमधून घुसखोरी करुन भारतीय सीमेत दाखल होणारा हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मुनीर हुसैन याला ठार केले तेव्हा हे उघड झाले.

तसेच, हिजबुल मुजाहिद्दीनचा डिव्हिजनल कमांडर मुनीर हुसैन 1993 मध्ये पीओकेमध्ये गेला होता. पण, त्याने पुन्हा काश्मीरमध्ये दहशत पसरवण्याचा कट रचला. मात्र, त्याला सुरक्षा दलांनी चकमकीत ठार मारले.

यासोबतच भारतीय लष्कराने पाकिस्तानची (Pakistan) नवी दहशतवादी योजना डिकोड केली. दहशतवाद्यांची दुकाने बंद केल्यानंतर पाकिस्तान आपल्या जुन्या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करत असल्याचे लष्कराला समजले आहे.

Terrorist Attack On Jammu Kashmir
Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक, तीन जवान शहीद

दुसरीकडे, केवळ मुनीर हुसैनच नाही तर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याच्या कटामागे रफिक नाईक आणि खुबीब नावाच्या दोन दहशतवाद्यांची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे.

15 ऑगस्टपूर्वी पाकिस्तानच्या या दहशतवादी योजनेचा पर्दाफाश केल्यानंतर भारतीय लष्करानेही काउंटर ऑपरेशन सुरु केले आहे. खोऱ्यात लपलेले दहशतवादी, त्यांचे सल्लागार आणि रसद पुरवणाऱ्या लोकांचा शोध घेतला जात आहे. यासोबतच डोंगराळ आणि जंगली भागात छापे टाकण्यात येत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com