School closures force Uttarakhand's Hindu children to study in madrassas, 700 students studying Islamic education:
देवभूमी म्हणून ओळखल्या जाणार्या उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मदरशांच्या संदर्भात रोज नव नवे खुलासे समोर येत आहेत. मदरशांच्या तपासादरम्यान पुन्हा एकदा धक्कादायक सत्य समोर आले आहे.
राज्यातील मदरशांमध्ये 700 हून अधिक हिंदू मुले इस्लामिक शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तराखंड मदरसा शिक्षण परिषदेने हा अहवाल राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे पाठवला आहे. आयोगाने उत्तराखंड सरकारला पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने हा प्रकार वाढण्यामागे बंद पडणाऱ्या सरकारी शाळा जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड मदरसा एज्युकेशन कौन्सिलचे संचालक राजेंद्र सिंह यांना माहिती विचारली असता त्यांनी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना सांगितले की, उत्तराखंडमधील 30 मदरशांमध्ये 749 हिंदू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
या तीस मदरशांमध्ये एकूण 7,399 विद्यार्थी आहेत. यापैकी २१ मदरसे हरिद्वारमध्ये, ९ उधम सिंह नगरमध्ये आणि १ मदरसा नैनिताल जिल्ह्यातील गुलर व्हॅली रामनगरमध्ये आहे.
या भागात सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा अभाव आहे, कारण येथील सरकारी शाळा कमी पटसंख्येमुळे बंद पडल्या आहेत.
हे सर्व क्षेत्र असे आहेत जे राज्याच्या निर्मितीनंतर मुस्लिमबहुल झाले आणि येथे मदरसे सुरू झाले.
विशेष म्हणजे हरिद्वार, उधम सिंह नगर आणि नैनिताल जिल्हा प्रशासनाने या हिंदू मुलांना आरटीई कायद्यांतर्गत कोणत्याही शाळेत प्रवेश देण्याचा विचार केला नाही.
सध्या, डेहराडून आणि नैनिताल जिल्ह्यांव्यतिरिक्त, अनेक ठिकाणे आहेत जिथे सर्वेक्षण करणे बाकी आहे. येथील मदरशांमध्ये मोठ्या संख्येने हिंदू मुले सक्तीने इस्लामिक शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी उत्तराखंडच्या अल्पसंख्याक व्यवहाराचे प्रधान सचिव एल फेनई यांना त्यांच्या 2 नोव्हेंबर 2023 रोजीच्या पत्रात या संदर्भात तपशीलवार माहिती देण्यास सांगितले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.