Covid emergency response package: केंद्राने राज्यांना दिले 1827 करोड रुपये

Mansukh L. Mandaviya: केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ट्विट द्वारे ही माहिती दिली आहे.
Union Minister of Health Mansukh L. Mandaviya
Union Minister of Health Mansukh L. Mandaviya Dainik Gomantak
Published on
Updated on

केंद्र सरकारने कोरोना विषाणुशी लढण्यासाठी इमरजेंसी कोविड रिस्पॉन्स पॅकेज (Covid emergency response package) अंतर्गत 1827 करोड रुपये देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरद्वारे ही माहीती दिली आहे. (Covid emergency response package: Center provided Rs 1827 crore to the states)

मनसुख मांडवीया यांनी ट्विट केले करत, "देशाला कोरोनाशी लढण्यास सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने ठरवलेल्या 'इमरजेंसी कोविड रिस्पॉन्स पॅकेज’च्या एकूण रकमेच्या 15% म्हणजेच 1827.80 कोटी रुपये राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आले आहेत. हे पॅकेज देशभरातील आरोग्य पायाभूत सुविधांच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर, मनसुख मांडविया यांनी घोषणा केली की, कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी 23,123 कोटी रुपयांचे इमरजेंसी कोविड रिस्पॉन्स पॅकेज मंजूर करण्यात आले आहे. मांडविया म्हणाले होते, 'नवीन इमरजेंसी कोविड रिस्पॉन्स पॅकेजसाठी मंत्रिमंडळाने 23,123 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यापैकी 15,000 कोटी केंद्र आणि 8000 कोटी राज्य सरकारसाठी आहेत.

Union Minister of Health Mansukh L. Mandaviya
SBI चे ग्राहकांना विशेष आवाहन...जाणून घ्या

या पॅकेजमुळे देशभरातील 736 जिल्ह्यांमध्ये बालरोग विभाग स्थापन केला जाईल. 20,000 ICU बेड तयार केले जातील. मुलांसाठी विशेष व्यवस्था तयार करण्यात येईल आणि या पॅकेज अंतर्गत औषधांचा बफर स्टॉक देखील तयार होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com