'देशात ना शेतकरी सुखी आहे ना जवान', सत्यपाल मलिकांनी मोदी सरकारवर साधला निशाणा

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
Governor of Meghalaya Satyapal Malik
Governor of Meghalaya Satyapal MalikDainik Gomantak

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. रविवारी पानिपतमधील एका कार्यक्रमात बोलताना मलिक म्हणाले की, 'आधी सरकारने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले आणि आता ते सैनिकांना उद्ध्वस्त करत आहेत.' अग्निपथ योजना चुकीची असून त्यामुळे सैनिकांचे मोठे नुकसान होणार असल्याचे ते म्हणाले. मलिक यांनी पानिपतच्या सिंक गावात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. यावेळी लोकांनीही राज्यपालांचे जोरदार स्वागत केले. कार्यक्रमाला संबोधित करताना सत्यपाल मलिक पुढे म्हणाले की, 'आज देशात ना शेतकरी सुखी आहे ना जवान सुखी.' (Satyapal Malik Attacks On Narendra Modi Government Tells His Retirement Plan)

दरम्यान, केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, 'आधी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले आणि आता सैनिकांची वेळ आली आहे.' एवढंच नाही तर अर्धी लढाई जिंकल्याचेही त्यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल म्हणाले. ते पुढे म्हणाले की, 'शेतकऱ्यांनी (Farmer) अर्धी लढाई जिंकली असून अद्यापही एमएसपीबाबत कायदा झालेला नाही. सैनिकांच्या भरतीसाठी 4 वर्षांची अग्निपथ योजना चुकीची आहे.' राज्यपाल पुढे म्हणाले की, 'एका सैनिकाची भरती केवळ 4 वर्षांसाठी केली जाईल आणि त्यापैकी तो 6 महिने रजेवर असेल. याशिवाय 4 वर्षांनंतर जेव्हा त्याला नोकरीमधून बेदखल केले जाईल तेव्हा तो इतर कोणतेही काम करण्याच्या स्थितीत नसेल.'

Governor of Meghalaya Satyapal Malik
"मी शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करायला घाबरणार नाही": राज्यपाल सत्यपाल मलिक

यादरम्यान सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी आपल्या निवृत्ती योजनेबद्दलही सांगितले. सत्यपाल मलिक पुढे म्हणाले की, 'माझा राज्यपालपदाचा कार्यकाळ 2 ते 3 महिन्यांत संपणार आहे. यानंतरही मी सत्य बोलत राहीन. शेतकरी आणि सैनिकांच्या बाजूने आवाज उठवत राहीन. मी राज्यपालपदावरुन पायउतार झाल्यानंतर कोणतीही निवडणूक लढवणार नाही. पण मी समाजासाठी आवाज उठवत राहीन.' याआधीही सत्यपाल मलिक यांनी अनेकवेळा केंद्र सरकारवर (Central Government) टीका केली आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com