'इस्लामच देशाचा शत्रू'... संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी इस्लाम धर्मा बद्दल आणि मुस्लिमांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Sambhaji Bhide News, Sambhaji Bhide's New controversial statement
Sambhaji Bhide News, Sambhaji Bhide's New controversial statementDainik Gomantak
Published on
Updated on

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी इस्लाम धर्मा बद्दल आणि मुस्लिमांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. संभाजी महाराज यांच्या बलिदानासंदर्भात पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना संभाजी भिडे म्हटले की, “आजही ज्या इस्लामच्या पोटतिडीकीतून औरंगजेबने संभाजी महाराजांचं बलिदान केलं तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे,” असं म्हटल आहे. भिडे यांच्या या वक्तव्यावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यताही यावेळी व्यक्त केली जातेय. (Sambhaji Bhide founder of Shiv Pratishthan has once again made a controversial statement)

Sambhaji Bhide News, Sambhaji Bhide's New controversial statement
'अजब प्रेम की गजब कहानी' PUBG खेळता खेळता पडली प्रेमात...; विवाहितेचं धक्कादायक पाऊल

“संभाजी महाराजांचा बलिदान मास आपण सर्व पाळतोय. त्याच्यात हिंदुस्तानच्या अस्तित्वाला असलेलं आव्हान दडलं आहे. औरंगजेब आणि संभाजी ही दोन माणसं होती, त्यांचं वैर होतं म्हणून औरंगजेबने संभाजी महाराजांना तुकडे तुकडे करुन मारलेलं नाही. त्याच्या अंतकरणातील इच्छा होती ती वेगळीच होती. कन्याकुमारी ते काश्मीर असा उभा देश तुकडे तुकडे करुन हा हिंदू धर्म, हिंदू समाज आणि हिंदुस्तान संपवून टाकावा ही त्याच्या पोटातील आग आणि चीड, दृष्ट भावना त्याने संभाजी महाराजांच्या बलिदानातून पूर्ण करुन घेत अंशत: समाधान मिळवलं,” असं भिडे संभाजी महाराजांच्या बलिदानाबद्दल बोलताना म्हटले आहे. (Sambhaji Bhide's New controversial statement News)

“आपण लक्षात घेतलं पाहिजे आज संभाजी महाराज नाहीयेत, औरंगजेब नाहीये, मेलेली मढी कशाला उकरुन काढायची, आता नवीनतम युग आहे. नवीन जगासोबत चालूयात, जुनं झालं गेलं विसरुन नव्या जगाबरोबर चालूयात असं म्हणणारी नादान, नालायक, देशघातकी वृत्ती सुशिक्षित लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसून येतात,” असं म्हणत संभाजी भिडेंनी सुशिक्षितांवरतीही टीका केली आहे.

Sambhaji Bhide News, Sambhaji Bhide's New controversial statement
'काश्मिरी तरुणांचा वापर करुन फुटीरतावादी पैसे कमवतायेत'

“संभाजी महाराज, औरंगजेब नाहीय. पण औरंगजेब आजही पाकिस्तान, बांगलादेश गाव वस्त्यांमधील मुस्लिमांच्या रुपाने आजही कुठेतरी शिल्लक आहे.

परंतु संभाजी महाराजांची जी आग होती ज्यात त्यांनी ऐन तारुण्यात आपल्या देशाचा आणि धर्माचा अभिमान न सोडता, न झुकता, न मागे सरकता, न शरण जाता त्यांनी देश देवाचा अभिमान मनात धरुन मरण पत्करलं परंतु इस्लाम धर्म स्वीकारला नाही. आजही ज्या इस्लामच्या पोटतिडकीतून औरंगजेबने संभाजी महाराजांचं बलिदान केलं आहे. तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे,” असंही भिडे यावेळी म्हणाले आहेत. “हा शत्रू अनेक रुपात गावोगावी हिंदुस्तानमध्ये नांदतोय, हिंदुस्तानच्या बाहेरही नांदतोय,” असंही ते यावेळी ते म्हणाले.

Sambhaji Bhide News, Sambhaji Bhide's New controversial statement
"पेगासस स्पायवेअर 25 कोटींना ऑफर केले होते, पण मी...": ममता बॅनर्जी

“इस्लामला त्याच पोटतिकडीने उत्तर देण्याची ताकद हिंदू समाजात संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहून आपण मिळवली पाहिजेत आणि ती आपल्याला मिळते. संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहणं ही स्वातंत्र्याची उपासना आहे, ही धर्माची, मातृभूमिचीच उपासना आहे,” असं संभाजी भिडेंनी यावेळी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, “संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहणं ही अत्यंत प्रखर राष्ट्राभिमान उत्पन्न करणारी/होणारी गोष्ट आहे. ती आपण करुयात आणि एक दिवस असा उजाडावा की झालेल्या बलिदानाचा सूड घेणारा हिंदुस्तान उभा रहावा ही अंतकरणामध्ये भावना धरुन आपण वाटचाल करत राहूयात,” असं आवाहनही भिडेंनी यावेळी केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com