Mohammad Farooq Khan
Mohammad Farooq KhanDainik Gomantak

'काश्मिरी तरुणांचा वापर करुन फुटीरतावादी पैसे कमवतायेत'

मोहम्मद फारुख खान (Mohammad Farooq Khan) उर्फ सैफुल्ला फारुखने माध्यमाशी बोलताना सांगितले की, 'मी स्वातंत्र्यासाठी लढत होतो.
Published on

पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय भारतात अशांतता निर्माण करण्यासाठी काश्मिरी तरुणांचा वापर करत आहे. पीओकेमध्ये शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्याने मोठा खुलासा केला आहे. मोहम्मद फारुख खान (Mohammad Farooq Khan) उर्फ सैफुल्ला फारुखने माध्यमाशी बोलताना सांगितले की, 'मी स्वातंत्र्यासाठी लढत होतो, परंतु नंतर आपला वापर केला जात असल्याचे दिसून आले.' (Pakistan and ISI use youth in Kashmir for their own purposes reveals ex terrorist)

दरम्यान, श्रीनगरचा (Srinagar) रहिवासी असलेल्या मोहम्मद फारुख खान याने सांगितले की, ''1989 मध्ये खोऱ्यात दहशतवादाची लाट आली होती. तेव्हा मी किशोरवयीन वयात होतो. इतर अनेक मुलांप्रमाणे मी दहशतवादी गटांमध्ये सामील झालो. एलओसी ओलांडून मला पाकव्याप्त काश्मीरमध्ये म्हणजेच पीओकेमध्ये नेण्यात आले. तिथे मला AK-47 सह अनेक शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर मी काश्मीरमध्ये परतलो. त्यानंतर मी दहशतवादी बनलो. 1991 पर्यंत मी सक्रिय दहशतवादी होतो.''

Mohammad Farooq Khan
'...म्हणून वाढू शकतो शेजारील देशांसोबत तणाव'

काश्मिरी तरुणांचा वापर करुन फुटीरतावादी पैसे कमवतायेत

फारुख पुढे म्हणाला, ''पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करु इच्छित आहेत. तो आपल्या स्वार्थासाठी काश्मिरी तरुणांचा वापर करत आहे. असे करुन फुटीरतावादी पैसे कमवत असून मोठमोठी हॉटेल्स बांधत आहेत.''

निष्पाप लोकांना मारुन...

त्याने पुढे सांगितले की, ''एके दिवशी दहशतवाद्यांनी एका विद्यापीठाचे कुलगुरु मुशीर-उल-हक यांची हत्या केली, त्यावरुन माझ्या मनात अनेक प्रश्नाचे तरंग उठले. मी माझ्या साथीदाराला म्हणालो, 'आपण स्वातंत्र्यासाठी लढत आहोत तर आपण निष्पाप लोकांना का मारलं?' त्यावर मला काहीच उत्तर न मिळाल्याने मी हा मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला आणि पोलिसांना शरण आलो.''

Mohammad Farooq Khan
'द काश्मीर फाइल्स' चा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले...

माजी दहशतवाद्यांच्या पुनर्वसनासाठी संघटना तयार करण्यात आली

फारुखने पुढे सांगितले की, ''मी 8 वर्षे तुरुंगात होतो. यादरम्यान मी तिहार तुरुंगात जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मौलाना मसूदचीही भेट घेतली. सुटकेनंतर मी सामान्य नागरिकाप्रमाणे जगू लागलो. दहशतवादाचा मार्ग सोडून गेलेल्यांच्या पुनर्वसनासाठी मी इतर साथिदारांसोबत जम्मू-काश्मीर मानव कल्याण संस्था स्थापन केली. यासाठी अनेक पोलीस अधिकाऱ्यांनीही आम्हाला मदत केली. ते म्हणतात की, भारत आपली मातृभूमी आहे. आता आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहोत. आम्हाला स्वतःसाठी पासपोर्ट हवा आहे. आमच्या मुलांच्या भविष्यासाठी सरकारची मदत हवी आहे.''

Mohammad Farooq Khan
मोदींनाही आवडला 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट; टीमची भेट घेऊन केले अभिनंदन

भरकटलेल्या तरुणांना दहशतवादाचा मार्ग सोडण्याचे आवाहन

तू दहशतवादाचा मार्ग का स्वीकारला असे विचारले असता तो म्हणाला, “1989 मध्ये अनेक मुलांनी दहशतवादाचा रस्ता पकडला. 1986 मध्ये धांदलीत निवडणुका झाल्या होत्या. पाकिस्तानमध्ये (Pakistan) असलेले युनायटेड जिहाद कौन्सिलचे प्रमुख सय्यद सलाहुद्दीन यांनीही निवडणूक लढवली होती. निवडणूक हरल्यानंतर त्यांनी दहशतवादाचा मार्ग स्वीकारला. सलाहुद्दीन निवडणूक हरला नसता तर त्याने बंदूकही उचलली नसती.'' फारुख यांनी भरकटलेल्या तरुणांना दहशतवाद सोडण्याचे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com