Sam Konstas Century: कसोटी सामन्यात 'वनडे'चा तडका! बुमराहशी पंगा घेणाऱ्या पठ्ठ्यानं ठोकलं तूफानी शतक; भारतीय गोलंदाज हवालदिल

India A vs Australia A First Test Match: भारत 'अ' आणि ऑस्ट्रेलिया 'अ' यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज 16 सप्टेंबरपासून लखनऊमध्ये सुरु झाला आहे.
Sam Konstas Century
Sam KonstasDainik Gomantak
Published on
Updated on

Sam Konstas Century: भारत 'अ' आणि ऑस्ट्रेलिया 'अ' यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज, 16 सप्टेंबरपासून लखनऊमध्ये सुरु झाला आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची दाणादाण उडवली. पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियन सलामीवीर सॅम कोन्स्टासने शानदार शतक झळकावले.

सॅम कोन्स्टासने सुरुवातीपासूनच फटकेबाजी सुरु केली. त्याला चांगली सुरुवात मिळाली. यापूर्वी, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्येही त्याने आपल्या फलंदाजीने प्रभावित केले होते. कोन्स्टासने आज दमदार शतक झळकावले, जे त्याच्या करिअरमधील एक अविस्मरणीय खेळी ठरली.

Sam Konstas Century
India vs Australia: दुसऱ्या T20 मध्ये पावसाचा अडथळा? काय आहेत तिरुवनंतपुरममधील हवामान अंदाज, घ्या जाणून

सॅम कोन्स्टासचे शतक आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजांची कामगिरी

सॅम कोन्स्टासने 144 चेंडूंमध्ये 109 धावांची तूफानी खेळी खेळली. आपल्या या शतकी खेळीत त्याने 10 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्याने आपल्या खेळीदरम्यान आकर्षक फटकेबाजी केली. त्याच्याव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांनीही उत्कृष्ट कामगिरी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. कॅम्पबेल केलावेने 96 चेंडूंमध्ये 88 धावांची दमदार खेळी खेळली, तर कूपर कोनोलीने 84 चेंडूंमध्ये 70 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. लियाम स्कॉटनेही 47 धावा करुन संघाला मोठी धावसंख्या गाठण्यास मदत केली. पहिल्या दिवसाच्या खेळाचा शेवट होईपर्यंत ऑस्ट्रेलिया 'अ' संघाने 5 गडी गमावून 337 धावा केल्या.

Sam Konstas Century
India vs Australia: टॉससाठी मैदानात उतरताच कॅप्टन रोहितचा रेकॉर्ड! द्रविड-धोनीला मागे टाकत बनला 'अव्वल'

भारताची निराशाजनक गोलंदाजी

एकूणच पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. भारताकडून सर्वाधिक महागडा गोलंदाज तनुष कोटियान ठरला. त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतासाठी पदार्पण केले. आजच्या सामन्यात त्याने 19 षटकांत तब्बल 92 धावा दिल्या. कोटियानसोबतच प्रसिद्ध कृष्णा आणि खलील अहमद यांनाही धावांवर नियंत्रण ठेवण्यात यश आले नाही.

भारतीय गोलंदाजांमध्ये फक्त हर्ष दुबे प्रभावी ठरला, ज्याने 3 गडी बाद केले. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही गोलंदाजाला ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दबाव निर्माण करता आला नाही.

Sam Konstas Century
India vs Australia 3rd ODI: टीम इंडियाला तिसरा सामना जिंकावाचं लागणार, नाहीतर...

दुसऱ्या दिवशी भारतासमोर मोठे आव्हान

पहिल्या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलिया 'अ' संघाचा स्कोअर 5 गडी गमावून 337 धावा आहे. आता दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना लवकरच उर्वरित ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद करुन त्यांना कमी धावसंख्येवर रोखण्याचे मोठे आव्हान आहे. त्यानंतर, भारतीय फलंदाजांनाही चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला तोंड द्यावे लागेल.

दरम्यान, या सामन्यात भारताच्या 'अ' संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत प्लेइंग 11 मध्ये संधी न मिळालेल्या अभिमन्यु ईश्वरनलाही या सामन्यात आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले असले तरी, भारतीय संघ दुसऱ्या दिवशी जोरदार पुनरागमन करेल, अशी आशा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com