Salman Khan: "बलुचिस्तान' आणि 'पाकिस्तान' वेगळे! सलमान खानच्या 'त्या' विधानावर वाद, नेटकऱ्यांनी घेतलं फैलावर VIDEO

Salman Khan Controversy: बॉलिवूडमधील तीन सर्वात मोठे सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान हे तिघे अलीकडेच एका मंचावर एकत्र दिसले.
Salman Khan
Salman KhanDainik Gomantak
Published on
Updated on

Salman Khan On Balochistan

बॉलिवूडमधील तीन सर्वात मोठे सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान हे तिघे अलीकडेच एका मंचावर एकत्र दिसले. सौदी अरेबियातील रियाध येथे झालेल्या ‘जॉय फोरम २०२५’ या भव्य कार्यक्रमात या तिघांची उपस्थिती चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरली. मात्र, या कार्यक्रमादरम्यान सलमान खानने केलेल्या एका वक्तव्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

कार्यक्रमादरम्यान भारतीय चित्रपटसृष्टीच्या जागतिक प्रभावाबद्दल बोलताना सलमान खान म्हणाला, “सध्या जर तुम्ही हिंदी चित्रपट तयार केला आणि तो येथे प्रदर्शित केला, तर तो सुपरहिट ठरतो. तमिळ, तेलुगू, मल्याळम असे कोणतेही भारतीय चित्रपट असोत ते शेकडो कोटींचा व्यवसाय करत आहेत, कारण विविध देशांतील लोक येथे काम करत आहेत.”

Salman Khan
Goa Rain: दिवाळीतही पाऊस! नरकासूरही भिजले; 2 दिवस यलो अलर्ट जारी

मात्र त्यानंतर सलमानने पुढे केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले. त्याने सांगितले, “आपल्या देशातील अनेक लोक येथे आले आहेत. बलुचिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इतर ठिकाणांहून सुद्धा लोक येथे काम करतात.”

या एका वाक्यानंतर सोशल मीडियावर चर्चा आणि वाद सुरू झाला आहे. अनेकांनी सलमानने बलुचिस्तानचा स्वतंत्र उल्लेख केल्याचे लक्षात घेतले आणि यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

काही वापरकर्त्यांनी लिहिले की, “सलमान खानने शेवटी कबूल केले की बलुचिस्तान हा पाकिस्तानचा भाग नाही.” तर काही जण म्हणाले की कदाचित सलमानची जीभ चुकली असावी आणि त्याचा हेतू वेगळा असावा. ‘बिलाल बलोच’ नावाच्या एका वापरकर्त्याने ‘एक्स’ (माजी ट्विटर) वर लिहिले, “सलमान खानने बलुचिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान वेगवेगळे उल्लेख केले. हे त्याचे मोठे विधान आहे.”

Salman Khan
Narkasur in Goa: नरकासुर स्पर्धेत राडा! काणकोणात मिरवणुकीच्या रस्त्यावरून दोन गट भिडले; जोरदार हाणामारी

या वक्तव्यावरून आता सोशल मीडियावर चर्चेचा भडका उडाला आहे. काहींनी सलमानचा हेतू विचारात घेऊन त्याचे समर्थन केले, तर काहींनी त्याच्यावर टीका केली.

रम्यान, बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा प्रांत असून, तेथील स्वातंत्र्यवादी चळवळी अनेक दशकांपासून सुरु आहेत. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानने या प्रदेशाला आपल्या देशात समाविष्ट केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com