Indian Railway Recruitment: 1 डिसेंबरपर्यंत करता येणार 1600 पदांसाठी अर्ज

Indian Railway Recruitment: आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल.
Indian Railway Recruitment 2021: Apply For 1600 Positions By Dec 1
Indian Railway Recruitment 2021: Apply For 1600 Positions By Dec 1Dainik Gomantak
Published on
Updated on

Railway Recruitment 2021: रेल्वे भर्ती सेल (RRC) ने उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थीसाठी (Railway NCR Online Form 2021) अधिसूचना जारी केली आहे. रेल्वेत नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.

ट्रेड अप्रेंटिसच्या 1600 हून अधिक रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार rrcpryj.org वर उत्तर मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात, अधिसूचना तपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

Indian Railway Recruitment 2021: Apply For 1600 Positions By Dec 1
Goa Police Recruitment: 734 रिक्त पदांसाठी असा करा अर्ज

महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख - 02 नोव्हेंबर 2021

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 डिसेंबर 2021

वयोमर्यादा

15 वर्षे ते 24 वर्षे वय असणे गरजेच आहे. 01 डिसेंबर 2021 नुसार वयाची गणना केली जाईल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयोमर्यादेत शिथिलताही दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता

एकूण 1664 रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने किमान 50% गुणांसह 10 वी -12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासह, संबंधित पदांसाठी आयटीआय पदवी असलेल्या उमेदवारांना संधी दिली जाईल.

उत्तर मध्य रेल्वेच्या रिक्त पदांचा तपशील

  • एकूण जागा: 1664 पदे

  • प्रयागराज विभाग: 703 पदे

  • आग्रा विभाग: 296 पदे

  • झाशी विभाग: 480 पदे

  • झाशी कार्यशाळा: 185 पदे

Indian Railway Recruitment 2021: Apply For 1600 Positions By Dec 1
Staff Nurse Recruitment: गोवा मेडिकल कॉलेजमध्ये 571 पदांची भरती

अर्ज शुल्क

अर्ज करण्यासाठी, 100 रुपये अर्ज शुल्क देखील भरावे लागेल. आरक्षित प्रवर्ग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये सूट दिली देण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील ज्यांची शेवटची तारीख 01 डिसेंबर आहे.

निवड प्रक्रिया

गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. SSC गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केला जाईल. अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. इतर कोणतीही माहिती हवी असल्यास उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जावून अधिसूचा तपासू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com