पुतीन यांच्या निर्णयानंतर जगभरातील देशांनी रशियावर उगारला कारवाईचा बडगा

यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणालाही मोठा आणि असामान्य धोका निर्माण झाला आहे.
Russia-Ukraine
Russia-UkraineDainik Gomantak

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील डोनेस्तक आणि लुहान्स्क या बंडखोर भागांना स्वतंत्र राज्ये म्हणून मान्यता दिली आहे. रशियाच्या या निर्णयानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सोमवारी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या आदेशानुसार, युक्रेनच्या DNR आणि LNR क्षेत्रांमध्ये अमेरिकन (America) व्यक्तींची नवीन गुंतवणूक, व्यापार आणि वित्तपुरवठा प्रतिबंधित असेल. बायडन यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशात युक्रेनची शांतता, स्थिरता, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता धोक्यात असल्याचे म्हटले आहे. यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणालाही मोठा आणि असामान्य धोका निर्माण झाला आहे. (Russia-Ukraine Crisis Latest News Update)

जो बायडन काय म्हणाले

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन म्हणाले, "रशियाने आंतरराष्ट्रीय कायद्याचे खुलेआम उल्लंघन केले आहे आणि या उल्लंघनातून रशियाला नफा होऊ नये यासाठी मी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे." आमची पुढील कृती काय असावी हे ठरवण्यासाठी आम्ही युक्रेनसह आमचे मित्र आणि भागीदार देशांशी जवळून सल्लामसलत करत आहोत.

Russia-Ukraine
महायुद्धाची झाली सुरुवात? युक्रेनने रशियाच्या सीमा चौकीवर केला बॉम्बहल्ला

रशियाच्या निर्णयावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष बोलले

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या घोषणेनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. बंडखोरांना मान्यता देण्याच्या रशियाच्या निर्णयाला आपण घाबरत नसल्याचे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले. युक्रेन सरकारला पाश्चिमात्य देशांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, असे ते म्हणाले.

ब्रिटन आणि एस्टोनिया रशियावर निर्बंध लादणार

त्याचवेळी ब्रिटन आणि एस्टोनियानेही पुतीन यांच्या निर्णयानंतर रशियावर निर्बंध लादण्याबाबत बोलले. ब्रिटनने सांगितले की, आज सरकारकडून रशियावर काही नवीन निर्बंध लादले जाऊ शकतात. ब्रिटनने रशियाचा हा निर्णय आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे मानले आहे. युक्रेनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेवर हल्ला आहे. दुसरीकडे, एस्टोनियाचे पंतप्रधान काजा कॅलास म्हणाले की, आम्ही रशियाच्या या कृतीचा निषेध करतो आणि हे युक्रेनच्या अखंडतेचे उल्लंघन आहे. राजनैतिक दरवाजे बंद करून रशिया युद्धाचे निमित्त करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com