500 रुपयांच्या नोटा बंद होणार? सोशल मीडियावर 'नोटबंदी'च्या चर्चांनी खळबळ; जाणून घ्या काय आहे सत्य!

Rs 500 notes going to be banned truth: सोशल मीडियाच्या जगात अफवा किती वेगाने पसरतात, याचे उत्तम उदाहरण सध्या पाहायला मिळत आहे.
Rs 500 notes going to be banned truth
Rs 500 notes going to be banned truthDainik Gomantak
Published on
Updated on

सोशल मीडियाच्या जगात अफवा किती वेगाने पसरतात, याचे उत्तम उदाहरण सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, व्हॉट्सॲप आणि ट्विटरवर एक मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ५०० रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनातून बाहेर केल्या जाणार असल्याचा दावा केला जात आहे. या बातमीमुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता केंद्र सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) टीमने या दाव्यामागचे सत्य समोर आणले आहे.

काय आहे व्हायरल मेसेजचा दावा?

सोशल मीडियावर पसरलेल्या मेसेजमध्ये असे म्हटले जात होते की, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) टप्प्याटप्प्याने ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणार आहे.

इतकेच नाही तर, मार्च २०२६ नंतर कोणत्याही एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटा बाहेर पडणार नाहीत आणि त्या बँकेत जमा करणे बंधनकारक असेल, असाही खोटा दावा करण्यात आला होता. या अफवेमुळे अनेकांना २०१६ मधील नोटाबंदीच्या आठवणी आठवल्या आणि नागरिकांनी या मेसेजवर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली.

Rs 500 notes going to be banned truth
Goa Politics: "गोव्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अवैध कामांविरुद्ध पुढे यावे"! फर्दिन रिबेलो, LOP युरी, आमदार फेरेरा यांच्यात चर्चा

पीआयबी फॅक्ट चेकने केला 'दूध का दूध, पाणी का पाणी'

या प्रकरणाची वाढती व्याप्ती पाहून सरकारच्या 'प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो'च्या (PIB) फॅक्ट चेक विंगने यावर स्पष्टीकरण दिले आहे. पीआयबीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली की, ५०० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा कोणताही विचार सरकार किंवा आरबीआयचा नाही.

"सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. आरबीआयने अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेतलेला नाही," असे पीआयबीने स्पष्ट केले आहे.

Rs 500 notes going to be banned truth
Goa Tamnar Project: गोवा तम्नार प्रकल्पाला ‘कर्नाटक’ची मंजुरी! वीजवाहिनीसाठी 13 हजार झाडांवर कुऱ्हाड; पर्यावरणप्रेमींत चिंता

आरबीआयची भूमिका आणि नागरिकांना आवाहन

रिझर्व्ह बँकेकडून वेळोवेळी नोटांची रिसायकलिंग आणि उपलब्धता तपासली जाते, मात्र याचा अर्थ नोटाबंदी असा होत नाही. बँकिंग प्रणालीमध्ये ५०० रुपयांच्या नोटा पूर्णपणे वैध आहेत आणि त्या राहतील.

आरबीआयने कोणत्याही अधिकृत परिपत्रकाद्वारे अशा प्रकारची घोषणा केलेली नाही. नागरिकांनी अशा कोणत्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणताही मेसेज पुढे पाठवण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पहावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com