World’s richest cricketer: कमाईतही 'सिक्सर' मारणारे क्रिकेटपटू, पहा कोण आहे सर्वात श्रीमंत!

Richest Cricketer In The World: क्रिकेट हा खेळ जगभरात लोकप्रिय आहे आणि अनेक देशांमध्ये त्याला धर्मासारखा मान दिला जातो. क्रिकेटपटूंना मैदानावर खेळून मिळणाऱ्या मानधनाबरोबरच जाहिरात, ब्रँड अ‍ॅम्बेसेडरशिप वरूनही मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते.
Richest Cricketer In The World
Richest Cricketer In The WorldDainik Gomantak
Published on
Updated on

क्रिकेट हा खेळ जगभरात लोकप्रिय आहे आणि अनेक देशांमध्ये त्याला धर्मासारखा मान दिला जातो. या खेळाच्या लोकप्रियतेमुळे क्रिकेटपटूंना मैदानावर खेळून मिळणाऱ्या मानधनाबरोबरच जाहिरात, ब्रँड अ‍ॅम्बेसेडरशिप, व्यवसाय आणि सोशल मीडियावरूनही मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते.

जगभरात असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे. यामध्ये काही खेळाडूंची एकूण संपत्ती १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक आहे. या संपत्तीमुळे ते केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे, तर जागतिक दर्जाचे उद्योजक आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जातात.

क्रिकेट सामने खेळण्याबरोबरच हे खेळाडू विविध ब्रँडच्या जाहिरातींमध्ये सहभागी होतात. काही खेळाडू स्वतःचे कपड्यांचे ब्रँड, स्पोर्ट्स अकॅडमी, हॉटेल चेन आणि इतर उद्योगही चालवतात. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत केवळ क्रिकेटपुरता मर्यादित राहत नाही. चला तर जाणून घेऊया जगातील टॉप 5 श्रीमंत क्रिकेटपटू.

Richest Cricketer In The World
Goa Crime: रागाच्या भरात पत्नीचा केला खून, 3 वर्षाच्या मुलाला घेऊन पळाला; झारखंडच्या व्यक्तीला न्यायालयाने ठरवले दोषी

सचिन तेंडुलकर

टाईम्स ऑफ इंडिया २०२४ च्या अहवालानुसार, सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन याच्याकडे सध्या सुमारे १७० दशलक्ष डॉलर्स इतकी अफाट संपत्ती आहे. मैदानावरच्या यशानंतरही त्यांनी विविध क्षेत्रांत गुंतवणूक करून आर्थिक स्थैर्य निर्माण केले आहे.

सचिनने अनेक मोठ्या ब्रँड्सची जाहिरात केली आहे, त्याच्या मालकीच्या 'SRT Sports Management' कंपनीद्वारे अनेक खेळाडूंचे व्यवस्थापन केले जाते. तसेच, त्याने हेल्थकेअर, अन्न प्रक्रिया, आणि स्पोर्ट्स ॲकेडमी यांसारख्या विविध व्यवसायांमध्येही गुंतवणूक केली आहे.

महेंद्रसिंग धोनी

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, ज्याची एकूण संपत्ती १११ दशलक्ष डॉलर्स असल्याचे २०२४ च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Richest Cricketer In The World
4G Tower In Goa: गोव्यात मोबाईल नेटवर्क होणार आणखी स्ट्राँग; IT विभाग 66 ठिकाणी उभारणार 4G टॉवर

विराट कोहली

सर्वात श्रीमंत सक्रिय क्रिकेटपटू म्हणजे विराट कोहली. त्याची एकूण संपत्ती ९२ दशलक्ष डॉलर्स असून तो अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि ब्रँड जाहिरातींमध्ये सक्रिय आहे. कोहलीचे स्वतःचे ‘one8’ नावाचे ब्रँड आहे. ज्याअंतर्गत परफ्युम्स, कपडे, आणि अनेक हॉटेल्स चालवले जातात. यामुळेच त्याचा व्यवसायाचा व्यापही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

रिकी पॉन्टिंग

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याचाही समावेश आहे. पॉन्टिंगची एकूण संपत्ती सुमारे $70 दशलक्ष आहे. निवृत्तीनंतर तो कोचिंग, कॉमेंट्री आणि ब्रँड अ‍ॅम्बेसेडरशिपमध्ये सक्रिय आहे.

ब्रायन लारा

ब्रायन लारा हा जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. वेस्ट इंडिजच्या या माजी खेळाडूची एकूण संपत्ती सुमारे $60 दशलक्ष आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com