Manish Jadhav
Tecno कंपनीने नुकताच आपला नवा आणि स्वस्त 5G स्मार्टफोन Tecno Spark Go 5G भारतात लॉन्च केला. 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च झालेल्या या फोनमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत.
या फोनची किंमत 9,999 एवढी आहे. हा फोन कमी बजेटमध्ये 5G कनेक्टिव्हिटी शोधणाऱ्यांसाठी एक बेस्ट पर्याय आहे.
यात 6.74 इंचाचा मोठा डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यामुळे स्क्रोलिंग आणि गेमिंगचा अनुभव चांगला मिळतो.
फोनमध्ये MediaTek Dimensity 6400 ऑक्टा कोर प्रोसेसर आणि 4 GB रॅम (4 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह) देण्यात आला आहे.
18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह यात 6000 mAh ची मोठी आणि दमदार बॅटरी आहे, जी दिवसभर टिकू शकते.
फोटोग्राफीसाठी यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
हा फोन Android 15 वर आधारित HiOS 15 वर काम करतो, ज्यामुळे तुम्हाला लेटेस्ट सॉफ्टवेअरचा अनुभव मिळेल.
या फोनमध्ये 'सर्कल टू सर्च', एआय रायटिंग असिस्टंट आणि नो नेटवर्क कम्युनिकेशन यांसारखे खास फीचर्स मिळतात.
Tecno Spark Go 5G ची विक्री 21 ऑगस्टपासून Flipkart आणि रिटेल स्टोअर्समध्ये सुरु होईल. हा फोन Vivo T4 Lite 5G, Poco M6 Plus 5G आणि Motorola G35 5G यांसारख्या फोन्सना टक्कर देईल.