Uttarakhand Wedding Destination: शिव-पार्वतीच्या साक्षीने बांधा लगीन गाठ, उत्तराखंडची ही ठिकाणं ठरत आहेत बेस्ट वेडिंग डेस्टिनेशन्स

Uttarakhand Wedding Destination: तुम्ही यंदा लग्न करायचा विचार करत असाल तर उत्तराखंड वेडिंग डेस्टिनेशनसाठी उत्तम ठिकाण ठरू शकते.
Uttarakhand Wedding Destination
Uttarakhand Wedding DestinationDainik Gomantak
Published on
Updated on

Uttarakhand new Wedding Destination ready Uttarakhand Kedarnath Narendra Modi advice read full story

वेडिंग सिझन सुरू झाला आहे. अनेक लोक वेडिंग डेस्टिनेशनसाठी प्लॅनिंग करतात. तुम्हीही धार्मिक आणि थंड हवेच्या ठिकाणी लग्नगाठ बांधण्याचा विचार करत असाल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या 'वेडिंग इन उत्तराखंड' चा प्रभाव दिसू लागला आहे.

श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समिती (BKTC) यासाठी सज्ज झाली आहे. आता ते मोठी धार्मिक स्थळे वेडिंग डेस्टिनेश बनवत आहे. शिव-पार्वतीचे लग्न स्थळ, केदारनाथ धाम, उषा-अनिरुद्ध विवाहस्थळ आणि ओंकारेश्वर मंदिरासह अशी काही ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे वेडिंग डेस्टिनेशन बनवत आहे.

  • उत्तराखंडी परंपराने लग्न

वेडिंग डेस्टिनेशन बनल्यानंतर या दोन पौराणिक ठिकाणांवर उत्तराखंडी परंपरेनुसार विवाहसोहळा संपन्न होणार आहे. स्थानिक महिलांना मंगळ गीते गाण्याचे, मंगळस्थान सादर करण्याचे आणि पारंपारिक पर्वतीय पदार्थ कसे तयार करायचे हे शिकवले जाईल. तुम्हाला येथे लग्न करायचे असेल तर मंदिर समितीकडेच नोंदणी करावी लागेल.

  • लग्नासाठी नोंदणी सुरू

मान्यतेनुसार उषा-अनिरुद्ध यांनी ओंकारेश्वर मंदिरात सात फेरे घेतले होते. याचा पुरावा म्हणजे मंदिराजवळील लग्नमंडप आहे. त्यात त्यांनी सात फेरे घेतले होते. या दोन्ही ठिकाणी मंदिर समितीने विभागासाठी रीतसर नोंदणी सुरू केली आहे. मंदिर समिती सर्व पौराणिक मंदिरे विवाहस्थळ म्हणून विकसित करण्याचा विचार करत आहे.

  • सर्व मंदिर वेडिंग डेस्टिनेशन

मंदिर समितीचे अध्यक्ष अजय अजेंद्र म्हणाले की, शांतीकुंज हरिद्वारच्या धर्तीवर वैवाहिक नियमावली बनवण्यात आली आहे. ओंकारेश्वर मंदिरात 5 कोटी रुपये खर्चून विस्तार व सुशोभीकरण करण्यात येत आहे.

उषा अनिरुद्ध यांचा लग्न मंडप बांधण्यात येत आहे. हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. पहिल्या टप्प्यात ओंकारेश्वर मंदिर संकुलातील टेम्पल प्लाझा, ॲडमिन बिल्डिंग आणि सध्याची प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मंदिराची कोठा इमारत आणि उषा अनिरुद्ध विवाह मंडपाचे काम सुरू करण्यात येणार आहे.

  • पंतप्रधान मोदींनी दिला होता सल्ला

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये डेहराडूनमध्ये झालेल्या उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडला वेडिंग डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर मंदिर समितीने आपल्या अखत्यारित असलेल्या मंदिरांमध्ये ते सुरू केले आहे. सर्वात पहिले त्रियुगीनारायण, शिव आणि पार्वतीच्या विवाहस्थळाच्या धर्तीवर, उषा आणि अनिरुद्ध यांच्या विवाहस्थळाला वेडिंग डिस्टिनेशन म्हणून विकास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com