देशात सध्या लाऊडस्पीकर वादाचे वारे जोरदार वाहत आहे. लाऊडस्पीकर वरून वाद होत आहे. मात्र उत्तर प्रदेशात हे लाऊडस्पीकर शांततेत खाली उतरवले असा दावा योगी यांनी केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) म्हणाले की, संवादातूनच आम्ही अनावश्यक लाऊडस्पीकर हटवण्यात यशस्वी झालो आहोत.
लाऊडस्पीकरचा आवाज संबंधित आवारातच राहील, हे काम सामंजस्याने करून आम्ही आदर्श घालून दिला आहे. राज्यात ही स्थिती यापुढेही कायम राहणार आहे. अनावश्यक लाऊडस्पीकर बसविण्याबाबत/मोठ्या आवाजात वाजविण्याबाबत पुन्हा तक्रार आल्यास संबंधित परिसरातील पोलीस अधिकारी याची जबाबदारी घेईल. संवादाद्वारे, ज्या लोकांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांतील लाऊडस्पीकर काढून टाकले आहेत, ते गरजेनुसार जवळच्या शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यास सहकार्य करतात, असे मुख्यमंत्री योगी काल झालेल्या बैठकीमध्ये बोलत होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येत्या 48 तासांत राज्यातील (Uttar Pradesh) विविध ठिकाणी सुरू असलेले बेकायदेशीर वाहन स्टँड हटवण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. बेकायदा टॅक्सी स्टँडच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले . स्टँडसाठी जागा निश्चित करून असे स्टँड नियमानुसार चालवावेत, असा आदेशही त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिला आहे.
प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये मुलांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास शिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगून त्यांनी विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि विद्यापीठांच्या प्रतिनिधींना वाहतूक नियमांबाबत प्रशिक्षण दिले पाहिजे असे सांगितले. येत्या दोन दिवसांत शाळांमध्ये पालकांच्या बैठकाही घ्याव्यात. या बैठकीमध्ये राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी तसेच वरिष्ठ प्रादेशिक, प्रादेशिक व जिल्हा पोलीस प्रमुख तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.