राजस्थानमधील सत्ताधारी अशोक गेहलोत सरकारला मोठा झटका बसला आहे. प्रदेश काँग्रेसचे आमदार गणेश घोघरा यांनी राजीनामा दिला आहे. सत्ताधारी पक्षाचे असूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप घोघरा यांनी केला आहे. आमदार गणेश घोघरो हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय मानले जातात. घोघरा हे राजस्थान युवक काँग्रेसचे प्रमुख आहेत आणि विधानसभेत डुंगरपूर जागेचे प्रतिनिधित्व करतात. विधानसभेचे अध्यक्ष सीएम गेहलोत आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिलेल्या पत्रात त्यांनी लिहिले की, "लोकांच्या समस्या मांडताना प्रशासन लक्ष देत नाही."
दरम्यान, राज्यात पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या राजीनाम्याने राजस्थान काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याचे कडवे आव्हान काँग्रेससमोर आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना त्यांच्याच पक्षातील नाराजीचा सामना करावा लागत असतानाच, राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.