Air India: प्रवाशांसोबत गैरवर्तन करणाऱ्या 2 प्रकरणांबाबत विमान नियामककडून एअर इंडियाला नोटीस

Air India: विमानामध्ये सातत्याने घडणाऱ्या अप्रिय घटना आणि त्यावर एअर इंडियाकडून न होणारी कारवाई यामुळे विमानप्रवासावर टीका करण्यात येत आहे.
Air India
Air IndiaDainik Gomantak

Air India: प्रवाशांसोबत अभद्र व्यवहार करणाऱ्या दोन घटनांबाबत डीजीसीए ने एअर इंडियाला नोटिस बजावली आहे. वेळीच एअर इंडियाने या प्रकरणांबाबत कारवाही का केली नाही असा प्रश्न एअर इंडियाला विचारला आहे.

26 नोव्हेंबर 2022 ला न्यूयॉर्क - नवी दिल्ली( Delhi ) या प्रवासादरम्यान, मद्यप्राशन केलेल्या एका व्यक्तीने आपल्या 70 वर्षीय महिला सहयात्रीवर लघुशंका केली होती. तर दुसरीकडे 6 डिसेंबरला पॅरिस-दिल्ली या विमानप्रवासादरम्यान अशीच घटना घडली होती. याआधीसुद्धा विमान नियामककडून एअरइंडियाला अनियंत्रित प्रवाशांना रोखण्याबबात नियमावली देण्यात आली होती. विमानामध्ये सातत्याने घडणाऱ्या अप्रिय घटना आणि त्यावर एअर इंडियाकडून न होणारी कारवाई यामुळे विमानप्रवासावर टीका करण्यात येत आहे.

विमानप्रवास सुरक्षित नसल्याचा नागरिकांमध्ये संदेश जात असल्याचे विमान नियामक,नागरी विमानन महानिदेशालय (DGCA)यांनी म्हटले आहे.पायलटची जबाबदारी आहे की होणाऱ्या घटनांकडे लक्ष देणे ही पायलटची जबाबदारी आहे. क्रूची स्थिती नियंत्रित करणे ही आणि अशा घटनांच्या कारवाईसाठी एअर लाइनच्या सेंट्रल कंट्रोलला माहिती देणे ही पायलटची जबाबदारी असल्याचे विमान नियमकाने म्हटले आहे.

Air India
Domestic Violence: धक्कादायक! घरगुती हिंसाचारात 23 % वाढ; सायबर गुन्हे, बलात्काराच्या तक्रारीही अधिक

दरम्यान, टाटा समूहाच्या एअर इंडियाच्या सीईओ कैम्पबेल विल्सन यांनी याबाबत माफी मागितली आहे. लवकरच याप्रकरणाची चौकशी करुन कारवाई केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.एअर इंडिया( Air India ) अशा प्रकरणांबाबत चिंतित आहे आणि अशा वाईट घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न केले जातील. नियमांचे पालन केले जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com