IOCL Recruitment: इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये 1968 पदांची भरती

या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 22 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू झाली आणि पात्र उमेदवार 12 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.
IOCL Recruitment 2021
IOCL Recruitment 2021Dainik Gomantak
Published on
Updated on

IOCL Refineries Jobs 2021: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)कडून अप्रेंटिस करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दिवाळाीच्या मुहूर्तावर एक चांगली बातमी आहे. कॉर्पोरेशनने त्यांच्या विविध रिफायनरीजमध्ये अप्रेंटिस पदासाठी 1968 अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 22 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू झाली आणि पात्र उमेदवार 12 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. हायस्कूल, इंटरमिजिएट, ग्रॅज्युएशन, आयटीआय आणि पॉलिटेक्निक डिप्लोमा पूर्ण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड भरती चाचणीच्या आधारे केली जाईल.

भरतीशी संबंधित महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख - 22 ऑक्टोबर 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 12 नोव्हेंबर 2021

प्रवेशपत्र जाहीर होण्याची तारीख - 16 नोव्हेंबर 2021

भरती परीक्षेची तारीख - 21 नोव्हेंबर 2021

निकालाची तारीख - 4 डिसेंबर 2021

IOCL Recruitment 2021
ISRO Recruitment: परीक्षा न देता फक्त एका मुलाखतीत मिळवा नोकरी आणि मोठा पगार

अत्यावश्यक पात्रता आणि वयोमर्यादा:

अप्रेंटिसच्या पदांसाठी विविध ट्रेडसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवार काही पदांसाठी अर्ज करू शकतात. पदवीधर तरुण काही विशिष्ट पदांसाठी अर्ज करू शकतात, तर काही पदांसाठी आयटीआय आणि पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा पूर्ण केलेलेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत. याशिवाय उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाणार आहे.

अर्ज फी: अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही श्रेणीतील उमेदवाराला कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. सर्वांसाठी अर्ज विनामूल्य आहेत.

ही निवड प्रक्रिया आहे,

अर्जदारांना प्रथम लेखी / ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल. त्यात मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता निश्चित केली जाईल. जे मेरिट लिस्टमध्ये स्थान मिळवू शकतील त्यांची अप्रेंटिस उमेदवारीसाठी निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा स्टायपेंड मिळेल.

IOCL Recruitment 2021
Metro Recruitment: मॅनेजर पदांसाठी नोकरीची संधी, मिळणार 1 लाखांहून अधिक पगार

अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या

अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम , तुम्हाला इंडियन ऑइल रिक्रूटमेंट पोर्टल www.iocrefrecruit.in वर जावे लागेल . वेबसाइटवर, तुम्हाला या भरतीची सूचना आणि अर्ज भरण्याची लिंक मिळेल. तुम्ही अधिसूचनेत दिलेल्या स्टेप्स फॉलो करून अर्ज भरू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com